‘या’ वर्दीतल्या बापमाणसाने उचलला ‘गुन्हेगारी’कडे वळालेल्या मुलांच्या शिक्षणाचा ‘खर्च’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अनेक अशा घटना आहेत ज्यात पोलिसांना टीकेला सामोरे जावे लागते. परंतु वर्दीतील एक असा बापमाणूस आहे ज्याने गुन्हेगारीकडे वळालेल्या तरुणाच्या हाती पेन आणि वही दिली आहे. काही दिवसांपूर्वी याच अल्पवयीन मुलाच्या हातात कोयते आणि तलवारी होत्या परंतु वर्दीतल्या याच बापमाणसामुळे त्याच्या हातात आज पेन आहे.

एका १४ वर्षीय अल्पवयीन तरुण सतत नागरिकांना मारहाण करणे, धमकी देणे असे प्रकार करत होता. पुण्यातील हडपसर भागातील हा प्रकार आहे. सदर तरुणाबद्दल पोलिसांकडे अनेकदा तक्रारी करूनही झाल्या होत्या. अनेकदा त्याला समजावून सांगून सोडले जायचे तरी त्यात काही बदल होत नव्हता. भाईगिरीचा शेवट काय होतो हे समजावल्यानंतर त्याला ते पटले. परंतु त्याची परिस्थिती जेमतेम होती. अर्ध्यात सोडलेले शिक्षण घेण्यास तो तयार झाला परंतु शिक्षण घेणारं कसं. हडपसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे यांना त्याने आपली इच्छा बोलून दाखवल्यावर क्षणाचाही विलंब न लावता ते त्याच्या शिक्षणाचा खर्च करण्यास तयार झाले. परंतु तू पु्न्हा गुन्हेगारीकडे वळालास तर बघ अशी ताकीदही त्याला दिली. आता त्याच्या शिक्षणालाही सुरुवात झाली आहे. प्रसाद लोणारे यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

आपल्या कामगिरीबाबत माहिती देताना प्रसाद लोणारे म्हणाले की, “मांजरी बुद्रुक येथे प्रशांतने(बदललेले नाव) रयत शिक्षण संस्थेच्या कृष्णाजी खंडूजी विद्यालयात इयत्ता नववीमध्ये प्रवेश घेतला आहे. प्रशांत आता गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडला आहे. समाजात असे अनेक तरूण आहेत जे गुन्हेगारीकडे वळतात. आम्ही नेहमीच अशा तरुणांना यातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करत असतो. या तरुणाने शिक्षणाचा योग्य मार्ग निवडला आहे. त्याला आम्ही सर्वतोपरी मदत करणार आहोत.

याबाबत बोलताना अल्पवयीन प्रशांत (बदललेलं नाव) म्हणाला की, “माझी आई धुणे भांड्याचे काम करते. मी तिला आणि भावाला सांभाळतो. मागील वर्षभरात मी कोयता गँग सोबत काम करायला लागलो. अनेकांना मारहाण करणे दम देणे असे गु्न्हे माझ्याकडून घडले. पोलिसांनी अनेकदा यातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन केले. हे सोडूने जेव्हा अर्धवट शिक्षण पूर्ण करायची इच्छा झाली तेव्हा सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे यांच्याकडे माझी इच्छा मी बोलून दाखवली. यानंतर ते शिक्षणाचा खर्च करण्यास तयार झाले. परंतु गुन्हेगारीकडे वळायचे नाही अशी ताकीदही त्यांनी मला दिली. खूप मोठा हो असे ते मला म्हणाले. त्यांच्यामुळे शिक्षण घेणे शक्य झाले आहे. पोलीस अधिकारी होण्याचे माझे स्वप्न आहे.”

आरोग्यविषयक वृत्त

‘ऐकावं ते नवलच’ ! तणावामुळे आयुष्य वाढणार ; घ्या जाणून

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

‘ही’ ५ सौंदर्यप्रसाधने ठरू शकतात त्वचेसाठी ‘घातक’ !

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच