दुर्दैवी ! क्रिकेट खेळताना आला ‘हार्टअटॅक’, सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा जागीच मृत्यू

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – मूळचे नाशिक येथे राहणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वसंत सानप (वय 38 वर्षे) यांचा हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला आहे. पालघरच्या सफाळे पोलीस स्टेशनमध्ये ते सध्या कार्यरत होते. क्रिकेट खेळताना अचानक आलेल्या हृदय विकाराच्या झटक्याने संदीप यांचा जागीच मृत्यू झाला.

त्यांना  तत्काळ वसई येथील प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र त्याच वेळी त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांकडून निश्चित करण्यात आलं. सानप हे गेल्या वर्षभरापासून सफाळे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त होते. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी नाशिक इथे अंत्यसंस्कार होणार आहे.

रायझिंग डे सप्ताहानिमित्त पालघर तालुक्यतील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत सफाळे येथील मकुणसार भागात आज क्रिकेटचे सामने घेण्यात आले होते. त्यावेळी मैदानात खेळत असताना सानप यांना मेजर अटॅक आला आणि सानप यांच्या जाण्याची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. सानप यांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/