सहाय्यक निरीक्षकास तडकाफडकी निलंबीत केल्यानं खळबळ

कोल्हापूर/मुरगूड : पोलीनासामा ऑनलाइन – मुरगूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक Bhaयांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई केली. या कारवाईमुळे कोल्हापूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक शिंदे यांना मुरगूड परिसरातील अवैध धंदे रोखण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी लेखी सुचना दिल्या होत्या. मात्र, शिंदे यांनी वरिष्ठांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. त्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अवैध धंद्यांना सहकार्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवून पोलीस अधीक्षकांनी त्यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली. अवैध धंद्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर प्रसंगी निलंबनाची कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा डॉ. देशमुख यांनी वेळोवेळी दिला होता.

मुरगूड आणि मुदाळतिट्टा परिरसारात विशेष पथकाने शनिवारी मटका आणि जुगार आड्ड्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी शिंदे यांना लेखी आदेश दिले होते. मात्र, शिंदे यांनी वरिष्ठांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like