सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश गुजर यांचा संशयास्पद मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – चिंचवडचे भूमीपुत्र सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश गुजर यांचा गडचिरोलीमध्ये संशयितपणे मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर चिंचवडमध्ये आज अंत्यसंस्कार होणार आहेत. गुजर यांनी मागील वर्षी सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.

योगेश गुजर हे  ११३ तुकडीचे पोलीस उपनिरीक्षक होते. त्यांची नियुक्ती सध्या गडचिरोली येथे होती. मागील वर्षी त्यानी सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घातला होता. तसेच नक्षलींविरोधातील मोहिमांमध्ये साहस दाखवले आहे. काल त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे कुटुंबिय चिंचवडमध्ये दळवीनगर परिसरातील समर्थ कॉलनीत राहतात. आई, वडील, भाऊ असा परीवार आहे. गुजर यांचा अत्यंत मनमिळावु स्वभाव होता. त्यांनी त्याच्या कार्यकाळात गडचिरोली येथे नक्षलवादी विरोधी कारवाया केल्या. त्यामुळे त्यांना पदोन्‍नती देखील लवकरच मिळाली होती. त्यांचा मृत्यु नेमका कशामुळे आणि कसा झाला याबाबत माहिती घेण्याचे काम चालु असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी पोलीसनामा ऑनलाइनला सांगितले आहे.