3 हजाराची लाच घेताना पुणे ग्रामीणचा पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुणे ग्रामीण पोलीस दलातील मंचर पोलीस ठाण्यात कर्तव्यास असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 3 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.

सहायक पोलीस उपनिरीक्षक जाधव असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी कारवाई करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जाधव हे ग्रामीण पोलीस दलात कर्तव्यास आहेत. त्यांची मंचर पोलीस ठाण्यात नेमणूक होती. दरम्यान, यातील तक्रारदार यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांना 138 नुसार वॉरंट बजवायचे होते. त्याचे काम जाधव यांच्याकडे होते. त्यावेळी वॉरंट बजावून अटक न करण्यासाठी यातील तक्रारदार यांना 3 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार जाधव यांना आज अडीच वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंचर पोलीस ठाण्याच्या आवारात 3 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.

Visit : policenama.com