पोलीस आयुक्त, उपायुक्त जबाबदार असल्याची चिठ्ठी लिहून ASI ची आत्महत्या

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – अमरावती येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने  राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली होती त्यामध्ये ‘आपल्या आत्महत्येस तत्कालिन पोलीस आयुक्त, उपायुक्त आणि लिपिक जबाबदार असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत आपल्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करू नये’, असे लिहण्यात आले होते. आजाराच्या रजा काळासोबत, ड्युटीवर असताना देखील दोन महिन्यांचे वेतन न मिळाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते आहे. रामसिंग गुलाबसिंग चव्हाण (५६) असे या मृत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रामसिंग हे कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मागच्या ३२ वर्षांपासून ते पोलीस खात्यात काम करीत होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांची पत्नी अमरावती महापालिकेत लिपिक म्हणून काम करते. तर दोन मुलांपैकी एक मुलगा पुणे आणि दुसरा मुलगा अमरावती येथे शिक्षण घेत आहे.

मागील वर्षी ड्युटीवर असताना रामसिंग यांचा अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्या कारणाने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यामुळे रामसिंग ड्युटीवर हजर राहू शकले नाही. या काळात त्यांचे वेतन काढण्यात आले नाही. त्यानंतर प्राकृती ठीक झाल्यानंतर ते नेहमीप्रमाणे  ड्युटीवर हजार झाले. पण त्यानंतर देखील गेल्या दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे गेले काही दिवस ते तणावातच होते. त्यांना त्यांच्या पुण्यात शिक्षण घेत असलेल्या मुलाला देखील पैसे पाठवावे लागत होते.

रामसिंग यांचे चिठ्ठीतून पत्नीला भावनिक आवाहन 

रविवारी १० मार्च रोजी रात्रीची ड्युटी केल्यानंतर साप्ताहिक सुट्टी असल्याने रामसिंग सोमवारी घरीच होते. पत्नी ड्यूटीवर आणि मुलगा अमन महाविद्यालयात गेल्यानंतर त्यांनी बंद घरात गळफास लावून आत्महत्या केली. रामसिंग यांनी मृत्यूपूर्वी दोन पानांची चिठ्ठी लिहून ठेवली होती. तत्कालिन पोलीस आयुक्त, उपायुक्त आणि लिपिक आपल्या आत्महत्येस जबाबदार असून त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल होईपर्यंत अंत्यसंस्कार करू नये, असे त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. पत्नीची माफी मागून मुलांची काळजी घेण्याचे भावनिक आवाहनही त्यांनी चिठ्ठीतून केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us