‘हा’ लघुग्रह पृथ्वीला धडकल्यास उडेल जगभरात ‘हाहाकार’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आगामी काळात, ब्रह्मांडातील एक लघुग्रह (दगडाचा एक मोठा तुकडा) पृथ्वीसाठी त्रासदायक ठरू शकतो. या लघुग्रहाला २००० QW7 असे नाव देण्यात आले आहे. जो कि, पृथ्वीच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. जर का, त्याने पृथ्वीला धडक दिली तर संपूर्ण जगात मोठा विनाश होऊ शकतो. सगळीकडे हाहाकार उडून जाईल.
Asteroid-3
अमेरिकेच्या अंतराळ संस्था (NASA ) नासाच्या म्हणण्यानुसार, हा लघुग्रह सिडनी हार्बर ब्रिजच्या लांबी एवढा आहे. जो कि, वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. हा लघुग्रह १४ सप्टेंबर रोजी पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये जेवढा अंतर आहे त्याच्या दुप्पट अंतराने जाईल. हा लघुग्रह सुमारे ५.३ दशलक्ष किमीच्या सुरक्षित अंतरापासून २३,१०० किमी प्रति तास या वेगाने पृथ्वी जवळून जाईल.
Asteroid-5
लाईव्ह सायन्स नुसार , याला एस्टेरॉयडची जवळची टक्कर मानले जात आहे. २,००० QW-7 हा लघुग्रह सुमारे ५.३ दशलक्ष किमीच्या सुरक्षित अंतरापासून २३,१०० किमी प्रति तास या वेगाने पृथ्वीच्या जवळून जाईल. अशाच वस्तूंना पृथ्वीच्या जवळून जाणाऱ्या वस्तू म्हटल्या जातात, जे क्षतिग्रह १४९.६ दशलक्ष किलोमीटरच्या आतून जातात. नासाने असा दगडाचा तुकडा पृथ्वीजवळ येण्याचा इशारा दिला आहे.
Asteroid-1
एस्टेरॉयड (क्षितीग्रह) पृथ्वीप्रमाणे सूर्याची परिक्रमा करत असतात. १ सप्टेंबर २,००० रोजी तो शेवटचं पृथ्वीच्या संपर्कात आला होता. आणखी एक थोडा छोटा क्षितीग्रह QV89 नावाचा २७ सप्टेंबर २००६ मध्ये पृथ्वीच्या जवळून जाणार होता परंतु तो त्यानंतर कधी दिसला नाही. ३० मीटर उंच उंचवटा दिसत असलेले ठिकाण अदृश्य झाले होते, परंतु जुलै आणि ऑगस्टमध्ये नासाच्या एनईओ स्टडीज सेंटर फॉर (सीएनईओएस) दुर्बिणींकडून पाहिले असता ते पुन्हा दिसून आले. २००६ पासून पृथ्वीच्या जवळ असे अचानकपणे दिसने एक चिंतेचे कारण होते.
Asteroid2
विश्वामध्ये अनेक उल्का, धूमकेतू आणि लघुग्रह तरंगतात असतात. जेव्हा ते गुरुत्वाकर्षणाच्या दबावाखाली येतात आणि नष्ट होतात तेव्हा ते अनियंत्रित असतात आणि कोणत्याही ग्रहाशी भिडतात. अशा कोणत्याही धडकेमुळं पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात विनाश होऊ शकतो. यापूर्वी असे एकदा झाले होते. १९०८ मध्ये सायबेरियातील तुंगुस्का येथील एक क्षितीग्रह पृथ्वीवर आदळण्यापूर्वी जळून खाक झाले. यामुळे सुमारे १०० मीटर मोठे फायरबॉल बनला गेला. त्यामुळे ८ कोटी झाडे यामुळे उध्वस्त झाली होती.

आरोग्यविषयक वृत्त –