Asthma Symptoms | फुफ्फुसात जमा कफ काढतात ‘या’ 4 आयुर्वेदिक वनस्पती; सूज-श्वासाच्या कमतरतेपासून मिळतो आराम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Asthma Symptoms | दम्याच्या लक्षणांबद्दल (Symptoms Of Asthma) बोलायचे तर रुग्णाला श्वास लागणे, छातीत आखडल्यासारखे वाटणे किंवा दुखणे, श्वास सोडताना घरघर, श्वासोच्छवासाचा त्रास किंवा खोकल्यामुळे झोप येण्यास त्रास होऊ शकतो. अस्थमाची लक्षणे (Asthma Symptoms) व्यक्तीनुसार बदलू शकतात. (Herbs To Get Rid Asthma Symptoms)
आयुर्वेदाने दम्याला असंतुलित कफ, वात आणि पित्त दोषांसाठी जबाबदार ठरवले आहे. ज्यामुळे कोरडा खोकला, कोरडी त्वचा, चिडचिड, ताप, चिंता आणि बद्धकोष्ठता (Dry Cough, Dry Skin, Irritability, Fever, Anxiety And Constipation) होते. दम्यासाठी आयुर्वेदिक उपचार हा देखील एक चांगला पर्याय आहे. आयुर्वेदानुसार, दररोज वापरल्या जाणार्या काही गोष्टी अस्थमाच्या रुग्णांना त्यांची लक्षणे नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात (Asthma Symptoms).
दम्यासाठी आयुर्वेदिक उपचार (Ayurvedic Treatment For Asthma)
वेद क्युअरचे संस्थापक आणि संचालक विकास चावला यांच्या मते, आयुर्वेदिक उपायांनी दमा बरा होऊ शकतो. मध आणि लवंग यांसारख्या गोष्टींमध्ये आढळणारे गुणधर्म फुफ्फुसांना मजबूत करतात. तसेच ओवा, तुळस, काळी मिरी, आले यापासून बनवलेला हर्बल चहा घेऊन मोहरीचे तेल छातीवर लावल्यास लगेच आराम मिळतो.
1. हर्बल टी (Herbal Tea)
अस्थमाचे रुग्ण त्यांची लक्षणे कमी करण्यासाठी विविध औषधी वनस्पतींपासून (Herbs) बनवलेले हर्बल टी नियमितपणे पिऊ शकतात. डॉ चावला यांच्या म्हणण्यानुसार, ओवा, तुळस, काळी मिरी आणि आले (Ajwain, Basil, Black Pepper And Ginger) यांच्या मिश्रणातून बनवलेला हर्बल चहा दम्याच्या रुग्णांसाठी चांगला उपाय आहे कारण तो कफ काढून टाकतो.
2. मध आणि कांदा (Honey And Onion)
दम्याचा अटॅक असताना रक्तसंचय आणि धाप लागणे कमी करण्यासाठी एका ग्लासमध्ये थोडी काळी मिरी, सुमारे 1 चमचा मध आणि थोडा कांद्याचा रस मिसळा आणि हळूहळू प्या.
3. मोहरीच्या तेलाची मालिश (Massage With Mustard Oil)
रुग्णाच्या छातीवर तपकिरी रंगाचे मोहरीचे तेल चोळल्यास किंवा मालिश केल्यास आराम मिळतो.
मसाज केल्याने फुफ्फुसांना ऊब मिळते, ज्यामुळे छातीत जमा झालेला कफ निघून जातो आणि श्वास घेणे सोपे होते.
4. हळद (कर्क्युमिन) (Turmeric)
हळदीमध्ये कर्क्यूमिन हा सर्वात शक्तिशाली घटक आढळतो आणि त्यामुळे हळदीचा रंग पिवळा असतो.
हळदीमध्ये काही औषधी आणि अँटिऑक्सिडंट घटक (Medicinal And Antioxidant Components) असतात,
ज्यांच्यात सूज रोखण्याची क्षमता आहे. दम्यासाठी हे गुणकारी आहे. यासाठी तुम्ही हळदीचे पाणी किंवा चहा पिऊ शकता.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Asthma Symptoms | according to ayurvedic doctor use 4 herbs to get rid asthma symptoms like cough and shortness of breath
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | शेजारी राहणार्या तरुणाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार; लोणीकंद परिसरातील घटना
Maharashtra Monsoon Updates | मान्सून आला..! महाराष्ट्रात ‘या’ दिवशी पावसाचं आगमन होणार – IMD