अस्थमाच्या रूग्णांनी घ्यावे लो-सोडियम डाएट

पोलीसनामा ऑनलाइन – अस्थमा हा फुफ्फसांशी निगडीत आजार असून या रूग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो. अस्थमाच्या रूग्णांच्या श्वास नलिकेला सूज येते आणि श्वसननलिका छोटी होते यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. अटॉपिक आणि गैर-अटॉपिक असे अस्थमाचे दोन प्रकार आहेत. अटॉपिक अस्थमा हा वातावरणातील धूळ, माती, प्रदूषणामुळे होतो. तर गैर-अटॉपिक अस्थमा श्वसनावाटे रासायनिक तत्व शरीरात गेल्यास होतो. या आजारावर योग्यवेळी उपचार न झाल्यास ते घातक ठरू शकते. अस्थमाच्या  आजारावर लो-सोडियम डाएट खूपच परिणामकारक असून तज्ज्ञांच्या सल्ल्याने ते फॉलो केल्यास फायदा होऊ शकतो.

कफ किंवा कोरडा खोकला येणे, छातीमध्ये दुखणे आणि अस्वस्थ वाटणे, व्यायाम करताना सतत दम लागणे आणि अस्वस्थ वाटणे, जोरात श्वास घेतल्याने थकवा येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, थंड हवेमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे ही अस्थमाची लक्षणे आहेत. तर कारखने, वाहनांमधून येणारा धूर, सर्दी, ताप, धुम्रपान, वातावरात होणारे बदल, अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ, पोटात अ‍ॅसिडचे प्रमाण वाढणे, औषधे आणि मद्यपान, आनुवांशिकता ही अस्थमा होण्याची प्रमुख कारणे आहेत.

अस्थमाच्या आजारात सैंधव मीठ खाल्याने आराम मिळतो. त्याचबरोबर मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने सूज, वेदना, कोरडा खोकल्यापासून आराम मिळतो. तसेच फ्रेश आणि फ्रोजन भाज्या कोणत्याही सॉसशिवाय खाल्याने फायदा होतो. तसेच ड्रायफ्रुट्सही अस्थमावर फायदेशिर आहे. अस्थमामुळे दीर्घकाळ त्रास सहन करावा लागतो. तसेच सातत्याने वैद्यकिय तपासणीची आवश्यकता असते. साधा ते तीव्र अस्थमा असलेल्या व्यक्तींनी दिर्घकाळ आणि दैनंदिन औषधे घेतल्याने दम्याच्या त्रासातून सुटका मिळते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like