Homeताज्या बातम्याAstrological Medical Center | 'या' ठिकाणी सरकारी रूग्णालयात देशातील पहिले ज्योतिष वैद्यकीय...

Astrological Medical Center | ‘या’ ठिकाणी सरकारी रूग्णालयात देशातील पहिले ज्योतिष वैद्यकीय केंद्र ! जन्मकुंडली, हस्तरेषा आणि राशिफळ पाहून आजारावर उपचार

दरभंगा : Astrological Medical Center | आपल्या देशात या गोष्टीची नेहमीच चर्चा होते की, जोतिष शास्त्र वास्तवात खरे आहे की केवळ लोकांचा विश्वास आहे. ही चर्चा तर अजूनही सुरूच आहे आणि यास मानणारे आणि न मानणारे सुद्धा आहेत. याच दरम्यान दरभंगाच्या (Darbhanga) सरकारी आयर्वेदिक हॉस्पिटलमध्ये देशातील पहिले ज्योतिष वैद्यकीय केंद्र उघडण्यात आले आहे, जिथे रूग्णांच्या आजाराचा शोध पॅथोलॉजी रिपोर्ट आणि X- ray पाहून नव्हे, तर त्याची जन्मकुंडली, हस्तरेषा आणि राशिफळ पाहून तज्ज्ञ करतात. (Astrological Medical Center)

 

रूग्णाचे ग्रह नक्षत्र बारकाईने पाहून त्याचा आजार ओळखला जातो. यानंतर रूग्णाला औषधाच्या बदल्यात मंत्र जपासह उपासना आणि पूजेसह ग्रह नक्षत्रांचे रत्न धारण करण्यास सांगून उपचार सुरू केले जातात.

 

दरभंगा आयुर्वेदिक कॉलेजमध्ये याची सुरुवात मागील 28 नोव्हेंबरपासून करण्यात आली आहे. रूग्ण सुद्धा आपल्यावर उपचार करण्यासाठी येथे येऊ लागले आहेत.

 

ज्यांच्याकडे जन्मकुंडली नाही अशा रूग्णांकडून ज्योतिषाचार्य रूग्णाची जन्मतारीख आणि जन्मस्थळाची माहिती घेऊन अगोदर रूग्णाची जन्मकुंडली स्वता तयार करतात, नंतर ग्रह नक्षत्राच्या दोष गुणानुसार रुग्णाचा आजार ओळखून उपचार सुरू करतात. मात्र, असे नाही की, सर्व रूग्णांचा उपचार एकाच विधीने होतो. गरज असल्यास काही रूग्णांना आयुर्वेदिक औषधे सुद्धा दिली जातात. (Astrological Medical Center)

 

सरकारी आयुर्वेदिक हॉस्पिटलचे अधीक्षक सह कॉलेजचे प्राचार्य डॉ. दिनेश्वर प्रसाद यांनी सांगितले की, प्राचीन काळात हे विज्ञान खुप लोकप्रिय होते, परंतु बदलत्या काळासोबत ते बाजूला पडले आणि नव्या युगातील लोक याच्यापासून दूर राहिले.

 

परंतु, आता पुन्हा हे वापरात येत आहे आणि सरकारी आयुर्वेदिक कॉलेज दरभंगा देशातील पहिले हॉस्पिलटल आहे ज्याने आयुर्वेद, योग आणि नैसर्गिक उपचारासह ज्योतिष उपचारांची सुरूवात केली आहे. हे काही दिवसातच लोकप्रीय होत आहे. देशातील विविध भागातून लोक फोन करून उपचारासाठी संपर्क करत आहेत, असा दावा करण्यात आला आहे.

 

 

प्रसाद यांनी म्हटले, आयुर्वेदाचे आवश्यक घटक ‘दिनचर्य’, ‘ऋतुचार्य’ आणि ‘पंचकर्म’ सिद्धांत सर्व उपचार ज्योतिषवर आधारित आहेत,
यासाठी ज्योतिष उपचारांना नकारले जाऊ शकत नाही. त्यांनी हे सुद्धा म्हटले की, रूग्णाला बरे होण्याची संबंध आहे,
परंतु डॉक्टरांच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये मतभेद असल्याने आयुर्वेद आणि ज्योतिष उपचार बाजूला पडला होता. ज्यास आता पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न सरकार सुद्धा करत आहे.

 

डॉ. दिनेश्वर प्रसाद यांनी सांगितले की, आर्यभट्ट नॉलेज यूनिव्हर्सिटीला मेडिकल ज्योतिषमध्ये पूर्ण
आभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूरीसाठी पाठवला आहे. आशा आहे की, लवकरच मंजूर केला जाईल.

 

सोबतच दरभंगामध्ये एक रिसर्च सेंटर उघडण्याचा सुद्धा प्रस्ताव सरकारला पाठवले आहे.
दरभंगामध्ये एम्स साकारण्याचा प्रस्ताव आहे. यासोबतच दरभंगा एयरपोर्ट ऑपरेशनल आहे.
आता देशातील पहिले ज्योतिष वैद्यकीय केंद्र येथे उघडण्यात आले आहे. (Astrological Medical Center)

 

Web Title : Astrological Medical Center  | darbhanga astrological medical center diseasetreatment with help of horoscope palmistry worship mantra chanting

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News