दावा : चीन-PoK साठी ‘विध्वंसक’ अन् ‘विनाशकारी’ ठरू शकतं 21 जूनचं ‘सूर्यग्रहण’

वाराणसी : आगामी काळ चीन आणि त्याच्याशी संबंधीत भूभागासाठी चांगला नाही, असे ज्योतिष शास्त्र आणि खगोलीय घटना, सूर्य ग्रहणावरून वाटत आहे. काशीच्या ज्योतिषाने दावा केला आहे की, 21 जूनला लागणारे सूर्यग्रहण गंधार (कंधार), पीओके (पुलिंद), काश्मीर भूभाग (काश्मीर) आणि चीनसाठी विध्वंसक ठरणार आहे.

हा दावा ज्या ग्रंथाच्या आधारे केला जात आहे, त्यामध्ये 6 व्या शतकाचे देवज्ञ ज्योतिषी आचार्य वराहमिहीर यांनी ही गोष्ट लिहिली होती, ज्याचे नाव ’बृहत्संहिता’ ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या एका श्लोकात हे लिहिले आहे की, आषाढ महिन्यात लागणारे सूर्यग्रहण पृथ्वीच्या या भूभागासाठी नुकसाकारक ठरेल.

देवज्ञ ज्योतिषी आचार्य ’वराहमिहीर’ चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या नवरत्नांमधील एक होते आणि त्यांनी सांगितलेले ज्योतिष सिद्धांत आजही लागू आहेत. त्यांनीच सांगितलेल्या सिद्धांतावर ज्योतिष विद्या टिकून आहे. देश-विदेशातील अनेक ज्योतिषी याचे पालन करतात.

6व्या शतकातील वराहमिहीर यांच्याद्वारे रचित ’बृहत्संहिता’ ग्रंथाच्या राहुचारा अध्यायाच्या श्लोक क्रमांक 77 मध्ये जे लिहिलेले आहे, ते चीन आणि त्याच्या लगतच्या भूभागात राहणार्‍यांसाठी वाईट बातमीपेक्षा कमी नाही, कारण या श्लोकानुसार, आषाढ महिन्यात लागणारे सूर्यग्रहण गंधार (कंधार), पीओके (पुलिंद), काश्मीर भूभाग (काश्मीर) आणि चीनसाठी विध्वंसक आहे.

भारताच्या उत्तर सीमावर्ती प्रदेशासाठी वाईट

याबाबत आणखी माहिती देताना काशीचे एक ज्योतिषी पंडित पवन त्रिपाठी यांनी सांगितले की, 21 जूनला मिथुन राशिवर लागणारे सूर्य ग्रहण (’बृहत्संहिता’ ग्रंथानुसार आषाढ महीन्यात लागणारे सूर्य ग्रहण) या ठिकाणांना खुप मोठ्याप्रमाणात नुकसानदायक ठरू शकते, कारण ग्रहांचा योग खुपच आपत्तीजनक होत आहे.

भारताच्या सीमावर्ती उत्तरेच्या देशातील लोक विद्रोह करू शकतात. नैसर्गिक प्रकोप, भूकंप, सैन्य कारवाई किंवा युद्धसुद्धा होऊ शकते. म्हणजे भारताच्या सीमावर्ती उत्तरेच्या क्षेत्रात काहीतरी वाईट होणार आहे. या कारणामुळे चीनचा नाश होऊ शकतो, यासाठी चायना यावेळी जे काही करेल, त्यामध्ये बॅकफुटवरच जाईल.

भारतावर या ग्रहणांच्या प्रभावाचा विचार केल्यास, मध्यवर्ती भूभागावर विशेष वाईट प्रभाव पडू शकतो आणि संपूर्ण देशात अराजकतेत वाढ आणि अग्निकांडसुद्धा होऊ शकते. सीमावर्ती क्षेत्रात प्रबळ युद्ध होण्याची शक्यता आहे.