ज्योतिष : 2020 मध्ये ‘या’ 5 राशींचं नशिब उघडणार, अचानक होणार आर्थिक लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नव्या वर्षाच्या सुरुवातीसाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे नव्या वर्षाबाबतची मोठी उत्सुकता सर्वांना आहे. ज्योतिषानुसार 2020 अनेक कारणाने महत्वाचे आहे. या वर्षाच्या सुरुवातीला शनी देवता तुमची रास बदलणार आहे. 24 जानेवारी 2020 पासून शनी धनु मधून मकर राशीत प्रवेश करणार आहे. नव्या वर्षाची सुरुवात कन्या आणि कुंभ राशीपासून होईल. ज्यामुळे हे वर्ष त्यांच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल.

शनिबरोबरच गुरु, राहू आणि केतू या वर्षी आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या बदलत्या चालीमुळे त्याचा थेट परिणाम राशींवर होईल. नव्या वर्षात अनेक राशीवर आर्थिक, कौटूंबिक आणि आरोग्यसंबंधित परिणाम होणार आहे.

मेष रास –
हे वर्ष मेष राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ असणार आहे. यावर्षात त्यांच्या कार्यात प्रगती होईल आणि सफलता मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. राहू राशीत असल्याने साहस देखील वाढेल. वैवाहिक दापत्यांनी या वर्षी थोडे संभाळून रहावे.

वृषभ रास –
हे वर्ष वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी सर्वसाधारण असणार आहे. शनि राशीत असल्याने तुम्हाच्या जीवनात आणि करिअरमध्ये उतार चढाव येऊ शकतात. यावर्षी या राशीच्या व्यक्ती गुंतवणूक करु शकतात ज्यामुळे आयुष्यात बदल होतील आणि आर्थिक लाभ देखील होईल. कुटूंबातील सदस्याबरोबर असताना देखील एकटेपणा सहन कराल. परंतु वर्षाच्या अखेरीस तुम्हाला गोड बातमी मिळू शकते.

मिथुन रास –
या राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्षा आर्थिक दृष्ट्या फलदायी ठरेल. पैशांची कमी भासणार नाही. किंवा कुठे गुंतवणूक केल्यास त्याचा चांगला परतावा मिळेल. आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागेल. खान्यापिण्याकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होईल.

तुळ रास –
या राशीच्या लोकांवर या वर्ष लक्ष्मी प्रसन्न असणार आहे. कुटूंबाबरोबर सुखी प्रसंगचा अनुभव घ्याल. या वर्षी कोणताही प्रवास इच्छा नसताना करु नका. वर्षाच्या मध्यकाळात तुमची आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे खाण्यापिण्यावर थोडे लक्ष द्या. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत. नव्या ऊर्जेने काम केल्यास आर्थिक बाजू मजबूत होईल.

वृच्छिक रास –
आर्थिक बाजू मजबूत राहिलं. यावर्षी तुम्हाला एखादा आर्थिक सल्ला मिळेल ज्याने तुमचे उत्पन्न वाढेल आणि प्रतिष्ठात देखील वाढ होईल. कुटूंबाच्या सुखात आणि सौदार्हात वाढ होईल. आईचा सन्मान करा तुमच्या जीवनात आनंद राहिलं. प्रेम संबंधासाठी हे वर्षी तुमच्यासाठी उत्तम असेल. प्रेम विवाह करण्याचा विचार करणाऱ्यासाठी हे वर्ष लाभकारक ठरेल. परंतु वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात तणाव असण्याची शक्यता आहे.

धनु रास –
या राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष सर्वसाधारण असेल. वर्षाची सुरुवातील उतरत्या साडेसातीचा प्रभाव दिसून येईल. यामुळे यशस्वी होण्यासाठी आधिक कष्ट करण्याची आवश्यकता आहे. यावर्षी प्रेम संबंधात वाद होण्याची शक्यता आहे, सावध रहा. शेअर बाजारात गुंतवणूक करणार असाल तर जाणकारांचा सल्ला नक्की घ्या.

मकर रास –
हे वर्ष या राशीसाठी प्रेम प्रसंगासाठी महत्वाचे असणार आहे. प्रवास करणाऱ्यासाठी हे वर्ष अत्यंत अनुकूल असेल. प्रवासादरम्यान लाभ होऊ शकतो. या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव हट्टी असल्याने सावध रहावे. कुटूंबातून सहयोग मिळेल. भाग्य उजळण्याची शक्यता आहे. तुम्ही पूर्ण मेहनत करत असाल तर नक्की यश मिळेल.

कुंभ रास –
नव्या इच्छा जागृत होतील. ज्या कामातून तुम्हाला काही अपेक्षा असेल तर तुमची अपेक्षा पूर्ण होईल. शनि कर्म फलदाता आहे आणि या व्यक्तींच्या राशीचे स्वामी आहेत. त्यामुळे जसे कर्म कराल त्याला अनुरुप फळ मिळेल. कोणतेही चुकीचे काम करु नका. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

मीन रास –
हे वर्ष या राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत आनंदाचे असणार आहे. यावर्षी कुटूंब, समाज आणि कार्यस्थळावरील पद, प्रतिष्ठा आणि सन्मान वाढेल. कुटूंबाची सुख शांती आणि शुभ कार्याचा योग आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या व्यक्ती आपल्या प्रेमसंबंधांना नवे वळण देण्यात यशस्वी ठरेल. विद्यार्थ्यांना अभूतपूर्व यश मिळण्याची शक्यता आहे. प्रेम संबंध जुळतील. अविवाहितांच्या विवाहाचा योग आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !