25 मे राशिफळ : सोमवारी ग्रह ‘परिवर्तना’मुळे ‘या’ 7 राशींना मिळणार ‘शुभ’ परिणाम

पोलीसनामा ऑनलाइन –

मेष
अजाचा दिवस चांगला आहे. उत्पन्न वाढेल आणि खर्चसुद्धा कमी होतील. सुखसुविधांमध्ये दिवस घालवाल. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल. कुटुंबात आईची प्रकृती थोडी कमजोर राहण्याची शक्यता आहे. परंतु, तिच्या स्वभावात राग दिसू शकतो. तुमची इच्छापूर्ती होईल. कामात लक्ष पूर्ण द्या, विचारपूर्वक काम करा.

वृषभ
आजचा दिवस महत्वपूर्ण आहे. कार्यक्षेत्रासह शाळा आणि प्रेमसंबंधासाठी सुद्धा आजचा दिवस अनुकूल आहे. तुम्ही आज रोमँटीक राहू शकता. कामात यश मिळेल. प्रिय व्यक्तीला घेऊन कुठेतरी फिरायला जाऊ शकता. एखादा चित्रपट बघण्याची इच्छा होईल. मात्र, शक्य होणार नाही. कामात सुद्धा चांगला प्रभाव दाखवाल. कौटुंबिक जीवनात काही समस्या येऊ शकतात. आई-वडिलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. काही लोकांचे तुमच्या प्रॉपर्टीकडे लक्ष असून त्यांच्यापासून सावध राहा.

मिथुन
आजचा दिवस प्रगतीचा आहे. काही नवी नाती बनवू शकता. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. मित्र, शेजारी, नातेवाईकांशी संबंध चांगले होतील. वाणी मधुर ठेवा. कामात सहकार्‍यांशी चांगले वागलात तर यश मिळेल. प्रेमसंबंधासाठी दिवस संमिश्र आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराला आरोग्याच्या समस्या त्रास देऊ शकतात. जोडीदाराकडून लाभ होऊ शकतो.

कर्क
आजचा दिवस पैशांच्या बाबतीत खुप चांगला आहे. कारण तुम्हाला धनलाभ होण्याचे योग आहेत. सासरकडून सुद्धा एखादी चांगली बातमी समजेल, ज्यामुळे मन आनंदी राहील. रागावर नियंत्रण ठेवले तर यश नक्की मिळेल. कामात स्थिती तुमच्या बाजूने राहील. लहान भावाकडून सुख मिळेल. वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्ती प्रेम व्यक्त करेल.

सिंह
आजचा दिवस संमिश्र परिणाम देईल. खर्च वाढतील. मात्र, इन्कममध्ये सुद्धा वाढ होईल. आरोग्य थोडे कमजोर राहू शकते. मानसिक तणावातून आता मुक्ती मिळण्याची वेळ आली आहे. वाहन चालवताना सावधानी बाळगा, अपघाताची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात स्थिती सुधारेल. एकमेकांच्या जवळ येऊ शकता. जीवन सुसह्य होईल. प्रेमसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे.

कन्या
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. मानसिकदृष्ट्या तणावग्रस्त राहू शकता. खर्चसुद्धा वाढतील. उत्पन्न कमी राहू शकते. मात्र, दिवस पुढे सरकल्यानंतर स्थिती बदलेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. पाय आणि डोळ्यांची विशेष काळजी घ्या. प्रॉपर्टीच्या प्रकरणात लाभ मिळेल. कामात स्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने राहील. वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे.

तुळ
आजचा दिवस अनुकूल आहे. कामात दबदबा राहील. वरीष्ठांशी संबंध सुधारतील. उत्पन्न चांगले होईल. व्यापारात यश मिळेल. प्रेमसंबंधात लकी रहाल, भरपूर प्रेम मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या माध्यमातून लाभ मिळण्याचा योग आहे. कुटुंबात थोडी समस्या राहू शकते. मात्र इतर क्षेत्रासाठी आजचा दिवस चांगला आहे.

वृश्चिक
आजचा दिवस तुमच्यासाठी आणि कार्यक्षेत्रात काही नवीन करण्यासाठी चांगला आहे. आज तुम्हाला एखादे नवीन काम दिले जाऊ शकते. जे थोडे आव्हानाचे असू शकते. तुमची बुद्धीमत्ता तुमच्या कामी येईल. पैशाच्या बाबतीतही दिवस चांगला आहे. वडीलांचे आरोग्य बिघडू शकते. तुमचे आरोग्य सुधारण्यास सुरूवात होईल. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधात प्रेमाचा दिवस आहे. प्रिय व्यक्तीची पूर्ण साथ मिळेल. वैवाहिक जीवनात तणावाला तोंड द्यावे लागले.

धनु
आजचा दिवस चांगला आहे. भाग्याची पूर्ण साथ मिळेल. कामात यश मिळेल. गुप्त पद्धतीने धन मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य थोडे कमजोर राहू शकते. जेवण चांगले घ्या, कारण आरोग्य चांगले राहीले पाहिजे. प्रिय व्यक्तीसोबत चांगला वेळ घालवाल. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून कामात चांगली साथ मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. आईचे सहकार्य मिळेल.

मकर
आजचा दिवस खुप उलथ-पालथ होण्याचा आहे. आरोग्य आणि धन याकडे लक्ष द्यावे लागेल. कारण याबाबतीत आजचा दिवस कमजोर आहे. कामात चांगले परिणाम मिळतील. एक काम ज्यासाठी तुम्ही धडपडत होतात, ते मार्गी लागेल. संततीच्या बाबतीत समस्यांना तोंड द्यावे लागेल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. काही लोक तुमच्या विरोधात उतरू शकतात.

कुंभ
आजचा दिवस सामान्य आहे. वैवाहिक जीवनात तणावातही प्रेम दिसून येईल. प्रेमसंबंधासाठी दिवस खुप चांगला आहे. कार्यक्षेत्रात तुम्ही आज चांगले काम करू दाखवू शकता. ज्यामुळे कौतूक होईल. व्यापारासाठी दिवस खुप चांगला आहे. आरोग्य कमजोर राहील. परीक्षेत चांगले प्रदर्शन कराल. विरोधकांवर मात कराल. मानसिक तणाव राहील.

मीन
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. आपल्याच कामात थोडा विलंब होईल. काही गोष्टी शिकून घ्या, कटू बोलू नका ज्यामुळे कुणाचे मन दुखावेल, आणि तुमचीच माणसे शत्रुसारखी वागू लागतील. थोडी काळजी घ्या. भाग्य कमजोर आहे. काम यशस्वी करण्यासाठी मेहनत करावी लागेल. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. आरोग्य कमजोर राहू शकते. कामात मन अस्वस्थ राहू शकते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like