ज्योतिषमध्ये ‘नोकरी’ आणि ‘व्यवसायातील’ अडचणी दूर करण्यासाठी ‘हे’ आहेत 4 ‘उपाय’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – ज्योतिष शास्त्रात प्रत्येक समस्यावर उपाय सांगण्यात आला आहे. या उपायामुळे व्यक्तींना चांगला लाभ मिळतो. कुंडलीत ग्रहदोष असल्यास यश मिळत नाही. ज्योतिषमध्ये चांगली नोकरी, पदोन्नती आणि व्यवसायांत प्रगती यासाठी काही उपाय दिले आहेत. या उपायामुळे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात.

१)  दररोज पक्षांना धान्य खायला घाला त्यामुळे नोकरी करताना येणाऱ्या समस्या कमी होतील, सात प्रकारचे धान्य एकत्र करुन ते पक्षांना खायला टाका.

२)  नोकरीसाठी मुलाखतीसाठी जाणार असाल तर घरातून निघताना डावा पाय पहिल्यांदा घरातून बाहेर टाका, या उपायामुळे शुभ परिणाम दिसेल.

३)  घरातील पहिले अन्न सकाळी गाय आणि संध्याकाळी कुत्र्याला खायला घाला. नोकरीत सकारात्मक परिणाम दिसेल.

४)  प्रत्येक शनिवारी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करा. यामुळे नोकरीत चांगला परिणाम पहायला मिळेल आणि वाद होणार नाहीत.

ज्योतिषीमध्ये अनेक समस्यावर उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायामुळे तुमच्या जीवनातील समस्या दूर होतील. तसेच जाणवणारा परिणाम कमी होईल. नोकरी, व्यवसायात करणाऱ्यांनी हे उपाय केल्यास त्यांना त्यांच्या कामात समस्या येणार नाही, तसेच यश मिळण्यासाठी अनेक समस्यांच्या सामना करावा लागणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like