पृथ्वीच्या ‘या’ व्हिडिओने समाजमाध्यमातील वापरकर्त्यांची जिंकली मने

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यापूर्वी तुम्हीच अंतराळातील अनेक व्हिडिओ पाहिले असतील. मात्र, आता अलीकडेच अंतराळामधून काढलेला पृथ्वीचा एक व्हिडिओ समाजमाध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अंतराळ प्रवासी विक्टर ग्लोवराने ट्विट केला आहे. या व्हिडिओने समाजमाध्यमातील वापरकर्त्यांची मने जिंकली आहेत.

ग्लोवर स्पेसएक्स क्रू ड्रॅगन आणि आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनचा निवासी आहे. त्यांनी समाजमाध्यमात ३० सेकंदांचा हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “अंतराळातील माझा पहिला व्हिडिओ. ड्रॅगन रेजिलिएंसच्या खिडकीतून पृथ्वीचा व्हिडिओ रोकॉर्ड केला आहे. मी केवळ कल्पना करू शकतो की, अंतराळातून खाली पाहण्याचा अनुभव कसा असतो.”

या व्हिडिओला आतापर्यंत १५ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे, तर १ लाखांपेक्षा जास्त लाईक्स असून, १६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडिओ रिट्विट केला आहे. तसेच अनेक वापरकर्त्यांनी हा व्हिडिओ सुंदर असल्याचे म्हटलं आहे.

दरम्यान, नासाने याआधी एक व्हिडिओ शेअर केला होता. नासातील शास्त्रज्ञांनी सांगितल्यानुसार, पृथ्वीपासून सुमारे ७ कोटी प्रकाश वर्षे लांब असलेल्या (SN 2018gv) सुपरनोव्हात हा स्फोट झाला होता. यापूर्वी अशाप्रकारचा व्हिडिओ पाहण्यात आला नव्हता. एखाद्या ताऱ्याचा भीषण स्फोट झाल्यास त्यास पार्नोव्हा असे म्हटलं जाते. अशाच एका स्फोटानंतर पृथ्वीचा जन्म झाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.