शास्त्रज्ञांचा अद्भुत शोध ! ‘पृथ्वी सारखा गृह मिळाला पण खूप दूर’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   न्यूझीलंडमधील खगोलशास्रज्ञांनी एक अद्भुत शोध लावला आहे. त्यांनी पृथ्वीसारखाच (exoplanet) ग्रह शोधून काढला आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 25 हजार प्रकाशवर्षं दूर आहे. या ग्रहाचं वैशिष्ट्य असं की त्याच्या पृष्ठभागावर पाषाण सापडले आहेत. या ग्रहाचं आतापर्यंत तरी काही नाव ठेवण्यात आलेलं नाही. पण ज्या मायक्रोलेन्सिगंद्वारे याचा शोध लागला त्याचं नाव OGLE-2018-BLG-0677 असं आहे.

न्यूझीलंडमधील कँटरबरी विद्यापीठातील शास्रज्ञांच्यामते 10 लाख संशोधनांत एकदाच असा शोध लावण्यात यश मिळतं. हा ग्रह सूर्याच्या 10 पट लहान अशा ताऱ्याच्या भोवती फिरत असल्याचेही कँटेनबरी विद्यापीठातील शास्रज्ञ हेरेरा मार्टिन यांनी सांगितले आहे.