साडेसहा किलोच्या बाळावर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

नवी मुंबई : वृत्तसंस्था
नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात अवघ्या १४ महिन्यांच्या बाळावर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. राम मिस्त्री असे या बालकाचे नाव आहे. लहान बाळावर यकृत प्रत्यारोपण करण्याची महाराष्ट्रातील ही पहिली घटना आहे. बाळाच्या मावशीने हे दान केल्याचे समजते. राम जन्माला आल्यानंतर पहिल्याच महिन्यात त्याला यकृताचा दुर्मिळ आजार असल्याचे निष्पन्न झाले. मुंबईतील ‘Transplants – Help the Poor’ या एनजीओच्या मदतीने मिस्त्री कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली.

या संदर्भात नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख मिर्झा यांनी सविस्तर माहिती दिली,” नवजात बालकांमध्ये ‘बिलोरी ऍक्ट्रेसीआ’ हा दुर्मिळ रोग आढळतो. या रोगाची सुरवात बाळ आठ महिन्यांचे असल्यापासून होते. यकृतात पित्त पेशी अनुपस्थित असल्याने शस्त्रक्रियेद्वारे ही कमतरता दूर केली जाते. रामाच्या बाबतीत ही प्रक्रिया खूप लवकर झाली कारण त्याच्या मावशीने यकृत दानाचा निर्णय घेतला. आमचे ध्येय आहे की, जास्तीत जास्त रुग्ण मुलांसाठी जीवनदायी यकृत प्रत्यारोपण करणे आहे, त्यांच्या कटुंबियांना देखील हे उपचार कमीत कमी खर्चात कसे मिळतील यासाठी प्रयत्नशील आहोत. या प्रत्यारोपणा नंतर तो दीर्घकाळ चांगले आयुष्य जगू शकतो.”

रामची आई ईशानी मिस्त्री म्हणाल्या,” बाळ या दुर्मिक रोगाचे निदान झाल्यावर मी अत्यंत तणावाखाली होते पण संबंधित संस्था, डॉक्टर आणि माझ्या बहिणीचे मी कायमची ऋणी राहीन.”

नवी मुंबईतील अपोलो रुग्नालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेंद्र त्रिवेदी म्हणाले की,” आपल्या यकृताचा एक भाग दान करण्यासाठी पुढे येत असलेल्या भावनेचा मी चांगला सन्मान करतो. यकृत हा एक एकमेव अवयव आहे त्याचा काही भाग दान केल्यानंतरही स्वतःच वाढतो.”