नायजेरिया : बोको हरमने शेतात काम करणार्‍या 110 लोकांचा गळा कापला; महिलांना उचलून घेऊन गेले

मैदूगुरी : वृत्तसंस्था – दहशतवादी संघटना बोको हरमने पुन्हा एकदा नायजेरियामध्ये नरसंहार करण्यास सुरुवात केली आहे. यूएनने माहिती दिली की, कट्टर इस्लामिक संघटना बोको हरमच्या दहशतवाद्यांनी शेतात काम करत असलेल्या 110 लोकांची अतिशय निर्घृण हत्या केली. बोको हरमच्या दहशतवाद्यांच्या एका सशस्त्र गटाने या लोकांचे खुलेआम गळे कापून हत्या केली आहे आणि त्यांच्या महिलांना उचलून घेऊन गेले.

नायजेरियामध्ये संयुक्त राष्ट्राचे मानवीय समन्वयक एडवर्ड कल्लोन यांनी म्हटले की, बोको हरामने किमान 110 लोकांची निर्घृणपणे हत्या केली आहे. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. ही घटना कोशोबे येथील आहे, जे मुख्य शहर मैदूगुरीच्या जवळ आहे. सुरुवातीला मरणार्‍यांचा हा आकडा 43 होता, जाे नंतर वाढून 70 झाला. मात्र, आता हा आकडा 110 वर पोहाेचला आहे. ही घटना सर्वांत हिंसक असून या प्रकारे थेट सामान्य नागरिकांवर केलेला हल्ला आहे. या दहशतवाद्यांना न्यायालयासमोर आणले पाहिजे.

अल जजीराच्या रिपोर्टनुसार, या नृशंस हल्ल्यात क्रूरपणे मजुरांना प्रथम बांधण्यात आले आणि नंतर गळे कापण्यात आले. नायजेरियाचे राष्ट्रपती मोहम्मदू बुहारी यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटले की, या हत्यांनी संपूर्ण देश घायाळ झाला आहे. भयंकर हल्ल्यादरम्यान लोकांना मदत करणारे मिलिशिया लीडर बाबाकुरा कोलो यांनी सांगितले की, 43 पेक्षा जास्त लोकांची गळा कापून घटनास्थळीच हत्या करण्यात आली.

कोलो यांच्यानुसार नक्कीच हे काम बोको हरामचे आहे, जी या परिसरात सक्रिय आहे आणि अनेकदा हल्ले केले आहेत. हे पीडित सोकोटा राज्याचे मजूर होते. ते उत्तरपूर्वमध्ये कामाच्या शोधात गेले होते. आणखी एका मिलिशिया इब्राहिम लिमननुसार, भाताच्या शेतात काम करण्यासाठी 60 शेतकर्‍यांना ठेका देण्यात आला होता. सर्व मृतदेह जाबरमारी गावात आणण्यात आले, जेथे ते रविवारी कुटुंबीयांना दफन करण्यासाठी देण्यात आले. 2009 मध्येसुद्धा सुमारे 36 हजार लोकांचा जिहाद वादात खून झाला आहे आणि 20 लाखांपेक्षा जास्त विस्थापित झाले आहेत.

You might also like