IED Blast | छत्तीसगडमधील दंतेवाड्यात नक्षलवाद्यांचा सुरुंग स्फोटात १२ ग्रामस्थ जखमी

दंतेवाडा : IED Blast | छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भुसुरुंगाचा स्फोट (IED Blast) होऊन त्यात बोलेरो वाहनामधील १२ जण जखमी झाले आहेत. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे.

गेल्या तीन वर्षात छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत २०४ लोकांचा मृत्यु झाला आहे. दंतेवाडा जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितले की, जिल्ह्यातील मालेवाही पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घोटिया गावाजवळ नक्षलवाद्यांनी भुसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. त्यात बोलेरो वाहनाचे नुकसान झाले आहे. या घटनेत १२ ग्रामस्थ जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना आज सकाळी साडे सात वाजण्याच्या दरम्यान घडली. नागरिक एका बोलेरो वाहनात बसून नारायणपूरहून दंतेवाडाकडे जात होते. घोटिया गावाजवळ बोलेरो पोहचल्यावर नक्षलवाद्यांनी भुसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. त्यात वाहनाचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचून त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

हे देखील वाचा

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या DA मध्ये झाली वाढ, जाणून घ्या कोण-को

णत्या राज्यात कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होईल वाढ

PM Svanidhi Yojana | खुशखबर ! फेरीवाल्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मोदी सरकार देऊ शकतं रोख 10000 रूपयेट्विटर ला देखील फॉलो करा

Amruta Fadnavis | पुण्यातील निर्बंधाबाबत अमृता फडणवीस ‘संतापल्या’; म्हणाल्या… (व्हिडीओ)


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  At least 12 persons were injured in an IED blast by Maoists at Ghotiya at around 7.30 am. Dantewada police reached

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update