पाकिस्तान विमान अपघात : 2 जण जिवंत वाचले, जाणून घ्या ज्यांनी मृत्यूवर केली मात

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : शुक्रवारी कराचीमधील रिहाइशी भागात पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे प्रवासी विमान कोसळले. या अपघातात 90 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 2 लोक बचावले आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर दोन अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत झालेल्या भीषण अपघातात दोन लोक वाचले आहेत, कदाचित काही इतर जणही बचावले असतील. बचावलेल्या दोन जणांपैकी एक बँक ऑफ पंजाबचे अध्यक्ष जफर मसूद आहे.

यापूर्वी कराचीच्या महापौरांनी सांगितले होते की, विमानातील सर्व लोक ठार झाले आहेत. यानंतर पाकिस्तानच्या स्थानिक टेलिव्हिजन वाहिनीने एक व्हिडिओ प्ले केला होता, ज्यात काही लोक एका व्यक्तीला स्ट्रेचरवर घेऊन जाताना दिसत आहेत. त्यामुळे असे दिसून येते कि, विमान अपघातात काही लोक बचावले आहेत. पाकिस्तानच्या एका माध्यमानुसार, बँक ऑफ पंजाब (बीओपी) चे मुख्य कार्यकारी अधिकारी जफर मसूद बचावलेल्यांमध्ये आहेत. त्यांना तातडीने इस्पितळात नेले गेले, तेथे त्यांचा भाऊ बरोबर असून आता प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या दुर्घटनेत तो बचावला याची मसूदच्या कुटुंबीयांनी पुष्टी केली आहे. तसेच पाकिस्तानचे शिक्षण व कामगार मंत्री सईद घानी यांनी कराची विमान अपघातातून वाचलेल्या एका व्यक्तीचे चित्र ट्विट केले आहे. ही व्यक्ती एक तरुण अभियंता आहे, ज्याचे नाव मोहम्मद जुबैर असल्याचे समजते. याक्षणी जुबैरची प्रकृती स्थिर आहे. जिन्ना रुग्णालयाने म्हंटले आहे कि, बरेच जखमी लोक त्यांच्याकडे आणण्यात आले होते. त्यातील एक अत्यंत वाईट पद्धतीने जाळला होता, त्याला रुग्णालयाच्या बर्न वॉर्डमध्ये हलविण्यात आले. जखमींमध्ये अनेक महिला आणि मुलांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एअरबस ए 320 (पीके -8303 विमान) ने लाहोरच्या अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. कराचीमधील मॉडेल कॉलनीच्या जिन्ना गार्डन भागात हे विमान कोसळले. तेथे अनेक घरांना आग लागली. हा भाग मलीर म्हणूनही ओळखला जातो. पाकिस्तानच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलरला इंजिन बिघाड असल्याची माहिती दिली, परंतु लँडिंगच्या अवघ्या एक मिनिट आधी त्याचा संपर्क तुटला. विमान वाहतूक नियंत्रणासह पायलटच्या संभाषणाचा शेवटचा ऑडिओ समोर आला आहे. यात पायलट म्हणाला की, इंजिन अयशस्वी झाले आहे. लँडिंगसाठी अधिकाऱ्यांनी दोन्ही धावपट्ट्या रिकाम्या केल्या होत्या.