खळबळजनक ! बुलढाण्यात सापडले 90 कुत्र्यांचे मृतदेह, पाय आणि तोंड होते बांधलेल्या अवस्थेत

नवी दिल्ली वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात 90 कुत्री मृत आढळल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी सायंकाळी बुलडाण्यातील वनपरिक्षेत्रातील गिरडा – सावळदबारा रोडवर अनेक ठिकाणी कुत्र्यांचे शव विखुरलेल्या अवस्थेत सापडल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की पाच ठिकाणी 100 हून अधिक कुत्री फेकण्यात आली आहेत. त्यातील  90 जण मृतावस्थेत सापडले, तर काही जिवंत होते.

मृत कुत्र्यांचे तोंड व पाय बांधले होते. त्यांच्या मृतदेहाची दुर्गंधी पसरल्यावर लोकांना कळले. ग्रामस्थांनी पोलिसांशी संपर्क साधला त्यानंतर वनविभागाला कळविण्यात आले. घटनास्थळावर पोलिस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना काही कुत्रे जिवंत आढळले. वनरक्षकाच्या तक्रारीच्या आधारे आवारा कुत्र्यांच्या अज्ञात मारेकऱ्याविरोधात क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कुत्र्यांच्या मृत्यूचे कारण पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतरच उघड होईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, शहरात आवारा कुत्रे पकडून त्यांना ठार मारण्यात आले असा पोलिसांना संशय आहे आणि त्यानंतर त्यांना वनक्षेत्रात फेकण्यात आले. या संदर्भात कुत्रे पकडणाऱ्यांची चौकशी केली जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त