नागपुरात लॅब असिस्टंट महिलेनं विभागप्रमुख महिलेवर फेकलं ‘अमोनिया’ द्रव, परिसरात खळबळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पॉलिटेक्निक कॉलेजातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेनं प्रयोगशाळेत वापरलं जाणारं अमोनिया द्रव दुसऱ्या महिलेवर फेकलं आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केल्याची माहिती समजत आहे.

या घटनेतील दोन्ही महिलांची नावे पोलिसांनी अद्याप उघड केलेली नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला ही शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजात लॅब असिस्टंट आहे. तिच्यावर आरोप आहे की, तिनं विभागप्रमुख महिलेवर जुन्या वैमनस्यातून अमोनिया द्रव फेकलं आहे. या घटनेत विभागप्रमुखांना किती इजा झाली आहे, तसेच या घटनेचा इतर तपशीलही पोलिसांनी अधिकृतपणे उघड केलेला नाही. मात्र त्या महिलेवर आरोप होताना दिसत आहेत. याशिवाय तिची चौकशीही होताना दिसत आहे. पॉलिटेक्निक कॉलेजातील प्रयोगशाळेत ही घटना घडली आहे.

ज्यांच्यावर अमोनिया द्रव फेकण्यात आलं आहे त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू असून त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आलं आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like