नायगाव येथे 86 वर्षाच्या आजीबाईची कोरोनावर मात, सुनिल दगडे पाटील यांनी केला सन्मान

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन – तालुक्यातील नायगाव येथील ८६ वर्षाच्या आजीबाई नुकत्याच कोरोनातून मुक्त झाल्या आहेत. पुरंदर तालुक्यातील नायगाव येथे ग्रामपंचायत नायगाव, श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोरोना विलगीकरण कक्षा मधून कुसुम एकनाथ तावरे वय ८६ वर्षे ह्या १५ दिवसात कोरोनामुक्त झाल्या. त्यांच्या बरोबर इतर ५ रुग्णांना सोडण्यात आले. या विलगीकरण कक्षामधून ३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना सन्मानित करून घरी पाठवण्यात येत आहे. १५ दिवसापूर्वी कुसुम तावरे यांची जेजुरी येथे कोरोना टेस्ट पॉजीटीव्ह आली. त्यानंतर त्यांना नायगाव येथील विलगीकरण कक्षामध्ये ठेवले.

तेथे त्यांच्यावर समुदाय आरोग्य अधिकारी आश्विनी थोरात, आरोग्यासेवक जी. डी. गायकवाड, मदतनीस पल्लवी भागवत यांनी उपचार केले. पंधरा दिवसानंतर पूर्ण बर्‍या होऊन घरी परतताना कुसुम तावरे व इतर बरे झालेल्या रुग्णांनी श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत नायगाव व विलगीकरण कक्षासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. यावेळी कुसुम तावरे यांचा भारतीय जनता पार्टीचे मुळशी तालुका उपाध्यक्ष सुनिल दगडे पाटील व सरपंच हरिदास खेसे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी सोसायटीचे चेअरमन विलास खेसे, सरपंच हरिदास खेसे, उपसरपंच दत्तात्रय दरेकर, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब कड, सुभाष चौंडकर, तसेच सोसायटीचे संचालक अशोक होले, माजी उपसरपंच चंद्रकांत चौंडकर, ट्रस्टचे सचिव राहुल कड, तलाठी प्रमोद झुरंगे, तसेच पांडुरंग कड, संजय कड, पोपट तावरे,ह नुमंत वाघले, महेश कड, योगेश घाटे, गोविंद खेसे, सचिन चौधरी, बाळासाहेब भागवत, नितीन कड, संतोष कड, तुषार गोरावडे, सोनू जगताप आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार माजी उपसरपंच चंद्रकांत चौंडकर यांनी मानले.