शिरूर मार्केट यार्डवर कांद्यास मिळाला क्विंटलला 3025 भाव

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर कृषि उत्पन्न बाजार समिती, शिरूर जि.पुणे चे नविन मार्केट यार्डवर भरत असणाऱ्या कांदा मार्केट मध्ये कांद्याची दररोज मोठ्या प्रमाणावर आवक होत असुन आठवड्याचे दर बुधवार, शुक्रवार व रविवार कांद्याची जाहीर लिलावाने विक्री होत असते. शुक्रवार दि.१८ सप्टेंबर ला सुमारे ५६४० पिशव्याची आवक झालेली असुन चांगल्या कांद्यास सुमारे २५०० ते ३०२५ रु प्रती क्विंटल याप्रमाणे दर मिळाला.

शिरूर येथे परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये पिकविलेल्या कांद्यासाठी जवळची आपल्या हक्काची बाजारपेठ मिळालेली असुन शेतकरी वर्ग अत्यंत आनंदी आहे. तसेच शेतकऱ्यांचा वाहतुक खर्च व वेळेची मोठी बचत होत असुन उत्पन्नात वाढ होत आहे असे यार्डवर कांदा विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगीतले.

कांदा हे पिक शेतकऱ्यांचे नगदी पिक असुन शिरूर यार्डवर शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, खेड, दौंड, जुन्नर तालुक्यातुन जवळचे मार्केट असल्यामुळे आवक होत आहे. बाजार समितीने यार्डवर शेतकऱ्यांचा कांदा उतरविणेसाठी शेड, लाईट, स्वच्छतागृह, सी.सी.टी.व्ही. इत्यादी आवश्यक त्या पायाभुत सुविधा उभारलेल्या आहेत. पुणे व शेजारील अहमदनगर, नाशिक जिल्ह्यामध्ये गरवा जातीचा डबल पत्ती असणाऱ्या कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. हा कांदा टिकाऊ असुन त्यास चांगली मागणी असते. यार्डवरील कांदा कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, तामीळनाडु, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम इत्यादी राज्यामध्ये विक्रीसाठी जात असतो.

शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल यार्डवरच विक्रीसाठी आणावा. शेतावर कांदा विक्री केलेल्या अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणुक केलेच्या तक्रारी येत आहेत. तसेच शेतमाल विक्री केला तर त्यांची वजन, बाजारभावामध्ये फसवणुक होऊ शकते. त्यासाठी बाजार समितीचे नविन मार्केट यार्डवर दर बुधवार, शुक्रवार व ऱविवार कांदा विक्रीसाठी आणण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती शंकरदादा जांभळकर यांनी केले.

तसेच शेतमाल वाळवुन, निवडुण गुलटी, दुभळका वेगवेगळ्या बारदाण्यात प्रतवारी करून आणावा असे उपसभापती विकासआबा शिवले यांनी सांगीतले. यार्डवर कांदा विक्रीचे दर हे शेजारील मार्केटपेक्षा जास्तच निघत असल्याचे सचिव अनिल ढोकले यांनी सांगीतले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like