तेव्हा पंतप्रधान अनिल अंबानींचे प्रतिनिधीत्व करीत होते

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राफेल विमान खरेदीच्या वेळी सरंक्षण विभाग वाटाघाटी करीत असताना कॉपोरेट आणि डिफेन्स यांच्यातील आर्थिक युद्धात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनिल अंबानींचे प्रतिनिधीत्व करीत होते, असा जोरदार हल्ला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी चढविला आहे. आम्ही गेले वर्षभर करीत असलेला आरोप खरा असल्याचे सिद्ध झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हिंदु वृत्तपत्राने आज राफेल प्रकरणी एक मोठा बॉम्बगोळा टाकला असून त्यावर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी या वृत्ताचा हवाला देऊन आम्ही गेली एक वर्षे राफेल बाबत जो आरोप करीत आलो आहोत. तो खरा ठरला आहे.

हिंदू ने दिलेल्या वृत्तानुसार जेव्हा राफेल प्रकरणी संरक्षण खाते वाटाघाटी करीत होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या पंतप्रधानांशी स्वतंत्रपणे समांतर वाटाघाटी करीत होते. जर तुम्हाला वाटाघाटी करायच्या असतील तर आम्हा मध्ये घेऊ नका, तुम्ही थेट वाटाघाटी करा असे सरंक्षण विभागातून पंतप्रधान कार्यालयाला सांगण्यात आल्याचे या बातमीत म्हटले आहे. त्याचवेळी राफेल चे कॉट्रक्ट अनिल अंबानी यांना देण्याचे आम्हाला सांगण्यात आले होते. हे स्पष्ट करण्यात आले.

याच्या आधारे राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढविला आहे. मोदी हे देशाचे नाही तर अनिल अंबानींचे प्रतिनिधीत्व करीत होते. आम्ही करीत असलेले आरोप खरे असल्याचे दिसून आले आहे. सरंक्षणमंत्री सीतारामन या खोटे बोलत असल्याचे त्यांनी एका प्रश्नांला उत्तर देताना सांगितले.

हिंदुतील वृत्तामुळे राहुल गांधी यांच्या गेल्या एक वर्षापासून करीत असलेल्या आरोपांना मोठी बळकटी मिळाली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ते आता राफेल बाबत आणखी कठोर टिका करण्याची शक्यता आजच्या त्यांच्या बोलण्यावरुन दिसून येत होते.