×
Homeताज्या बातम्यात्यावेळी ‘विराट’ने घेतली होती अरुण जेटली यांची बाजू 

त्यावेळी ‘विराट’ने घेतली होती अरुण जेटली यांची बाजू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली क्रिकेट बोर्डाचे (डीडीसीए)चे अध्यक्षपद अरुण जेटली यांनी तब्बल १४ वर्षे सांभाळले होते. दिल्लीमधील क्रिकेटचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी काहीही प्रयत्न केले नाहीत असा आरोप आपने केला होता. तेव्हा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांनी त्यांची बाजू घेतली होती. अरुण जेटली यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय कर्णधाराने ट्विट करुन जेटली यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.

जेटली यांच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला असून खूप दु:ख झाले. ते नेहमी इतरांना मदत करत. २००६ मध्ये जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा ते वेळात वेळ काढून श्रद्धांजली वाहण्यासाठी माझ्या घरी आले होते, असे कोहलीने ट्विटमध्ये म्हटले आहे.

जेटली हे १९९९ ते २०१३ पर्यंत अशी १४ वर्षे डीडीसीएचे अध्यक्ष होते. तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ते उपाध्यक्षही होते. त्यांनी दिल्लीतील क्रिकेटचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. ते अध्यक्ष असताना सेहवाग पासून विराटपर्यंत अनेकांना टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली.

२०१५ मध्ये दिल्लीमधील आम आदमी पक्षाने डीडीसीएमधील अरुण जेटली यांच्या कारभारावरुन आरोप केले होते. १४ वर्षाच्या काळात त्यांनी डीडीसीएमधील आर्थिक घोटाळ्याकडे काना डोळा केल्याचा आरोप केला होता. तेव्हा विराट कोहलीने ट्विट करुन तत्कालीन अर्थमंत्री जेटली यांची बाजू घेतली होती. अरुण जेटली आमच्या संघटनेचे अध्यक्ष असल्याचे समाधान आहे. त्यांनी कायम खेळाचा दर्जा वाढविण्यासाठी आणि क्रिकेटपटूंना मदत करण्यासाठी काम केले आहे, असे ट्विट कोहली याने केले होते. कोहलीपाठोपाठ सेहवान आणि गौतम गंभीर यांनीही जेटली यांची बाजू घेतली होती.

आरोग्यविषयक वृत्त –

Must Read
Related News