बकऱ्या सांभाळत त्याने ४० वर्षात खोदले १४ तलाव ..!

कर्नाटक: मांड्या वृत्तसंस्था

जगात काही घडू  शकत. असं आपण बरेच वेळा म्हणतो आणि त्याची उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. बिहारच्या दशरथ मांझीबद्दल माहिती असेलच ,ज्याने डोंगर फोडुन रस्ता तयार केला. असाच एक कारनामा कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यातही एक अवलियाने केला आहे. त्यांचे नाव आहे  केरे कामेगौडा ते आता ८२ वर्षाचे आहेत. कामेगौडा  यांनी एक, दोन नाही तर तब्बल १४ तलाव खोदले आहेत.

कामेगौडा आज ही त्यांचं काम करत आहेत. त्यांचं घर डासनाडोड्डीमध्ये असून त्यांचा परिवार झोपडीत राहतो. कामेगौडा हे कुंदिनीबेट्टा गावाजवळ बकऱ्या चारतात. केरे सांगतात , मी सुरवातीला काठीने खड्डा खोदायचो हे खूप कठीण काम होत. त्यानंतर मी माझ्या जवळील काही मेंढ्या विकून खड्डे खोदण्यासाठी अवजारे विकत घेतली, आणि काम सुरु केले. खड्ड्यांचं रुपांतर तलावात झाल्यानंतर जनावरांना पाणी मिळतयं हे माझ्या लक्षात आले. हे पाहून मी माझ काम सुरू ठेवले.

[amazon_link asins=’B077J5D76C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1ea2b6c7-8e5e-11e8-9178-ab330705eb75′]

कामेगौडा यांचा मुलगा म्हणतो –

कुठलेही शिक्षण न झालेल्या माझ्या वडिलांनी पाण्याचा प्रवाह आणि इतर टेक्निक विकसित करून घेतल्या. माझे वडिल फक्त रात्री घरी येतात, दिवसभर ते डोंगरावरील आपली झाडे आणि तलावांची काळजी घेत असतात. त्यांनी स्वतःला या कामात एवढे झोकून दिले आहे की , ते ८२ व्या वर्षी देखील तरुणाला लाजवेल असे न थकता काम करत आहेत

जाहिरात