राज्यपालांकडून निमत्रंनाचं पत्र, सत्ता स्थापनेबाबत भाजपचा अद्याप ठोस निर्णय नाही

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपालांकडून भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले आहे. त्यासंबंधित पत्र राज्यपालांकडून भाजपला पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर सुधीर मुनगंटीवर यांनी दिलेल्या माहितीत सांगितले की राज्यपालांकडून येणाऱ्या पत्रावर उद्या कोअर कमिटीत निर्णय घेण्यात येईल.

राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केल्यानंतर भाजपची उद्या बैठक होईल असे सांगण्यात आले. यावर बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की राज्यपालांनी आम्हाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. त्या संबंधित अजून आमचा कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. राज्यपालांकडून आम्हाला आमंत्रित करण्यात आले आहे, उद्या यावर कोअर कमिटीत निर्णय घेण्यात येईल. परंतू ही बैठक उद्या किती वाजता होणार यासंबंधित त्यांनी भाष्य केले नाही.

यावर दिल्लीतील नेत्यांशी संपर्क साधणार का यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आम्ही चर्चा केल्यानंतर आवश्यकता भासल्यास दिल्लीतील नेत्यांना संपर्क साधू. परंतू आम्हाला वाटते की युतीचे सरकार स्थापन व्हावे. जनादेश दिलेले सरकार स्थापन व्हावे असे आम्हाला वाटते.
सत्ता स्थापनेसाठी कोणतीही मुदत नाही. परंतू सरकार स्थापन झाले नाही तर राज्यपाल सत्ता स्थापनेची वाट पाहणार नाही, ते पुढील विचार करतील असे देखील मुनगंटीवार म्हणाले.

Visit : Policenama.com 

You might also like