महापालिकेत महापौरांच्या हस्ते “गुणवंत कामगार पुरस्कार” सोहळा

पुणे :  पोलीसनामा आॅनलाईन

महानगरपालिकेच्या विविध विभागातील वर्ग एक ते वर्ग चार अधिकारी व कर्मचारी सन २०१४-१५ व सन २०१५-१६ या सालामधे उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा “गुणवंत कामगार पुरस्कार” पुणे शहराच्या प्रथम नागरिक मा. महापौर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या पुरस्काराचे अनेक मानकरी विविध विभागातून ठरवण्यात येऊन त्यांना कामगार कल्याण निधी आयोजित मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक, शाल व रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले. त्यापैंकी अग्निशमन दलामधे धाडसी कामगिरी तसेच खेळामधे विषेश प्रावीण्य दाखिवणारे जवान यांचा ही सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती शौर्यपदक विजेते सुभाष जाधव यांनी एनसीएल येथे लागलेल्या आगीवर बजावलेली कामगिरी, राजेंद्र पायगुडे यांनी डेक्कन चौकात मुलींच्या वसतिगृहात लागलेल्या आगीवेळी मुलींची केलेली सुटका, किरण जाधव यांनी बोपोडी येथील नदीमधे एका बुडत्या मुलीला दिलेले जीवदान तर प्रसाद वाळूंजकर यांनी दलामधे विविध आग व अपघातांवर काम करत खेळामधे सातत्य ठेवत मिळवलेले विषेश प्रावीण्य. या जवानांचे व महापालिकेच्या इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे महापालिकेच्या मुख्य भवनामधे सन्मान करत कौतुक करण्यात आले.

यावेळी कामगार सल्लागार विभागाचे प्रमुख शिवाजी दौंडकर यांनी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने या पुरस्काराकरिता पुढे येत सहभाग दाखवत नाहीत अशी खंत व्यक्त केली. तर मा. महापौर यांनी पुरस्कार मिळालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले.