हिरव्या रंगाच्या कापडाने का झाकलेल्या असतात बांधकाम सुरू असलेल्या आकाशाला ‘गवसणी’ घालणाऱ्या इमारती? उत्तर माहित नसेल तर हे वाचा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – शहरात आपण उंच-उंच इमारतींचे बांधकाम सुरू असताना नेहमी पाहतो. मोठ-मोठ्या क्रेन आणि मशीन्सच्या मदतीने या गंगनचुंबी इमारती उभारल्या जातात. अशा कन्स्ट्रक्शन साईटवर एक गोष्ट आपल्याला नेहमी दिसते ती म्हणजे हिरवा कपडा. या हिरव्या कपड्याने बांधकाम सुरू असलेल्या इमारती झाकलेल्या असतात. कधी विचार केला आहे का, की अशा इमारती हिरव्या कपड्याने का झालेल्या असतात. तुम्हाला माहित नसेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत याचे कारण….

या हिरव्या कपड्याचे कारण हे सांगितले जाते की, उंचावर काम करणार्‍या कामगारांचे लक्ष विचलित होऊ नये किंवा स्वताला अचानक इतक्या उंचीवर पाहून ते विचलित होऊ नयेत. कारण हे त्यांच्यासाठी घातक ठरू शकते.

सोबतच बाहेरचे लोक सुद्धा उंच इमारतीकडे सतत पहात असतात. अशावेळी तिथे काम करणार्‍या लोकांवर कोणताही मानसिक दबाव येऊ नये. यासाठी बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंगला हिरव्या रंगाच्या कपड्याने झाकले जाते.

सर्वात मोठे कारण हे आहे
जिथे इमारतीचे बांधकाम काम सुरू होते, तिथे कन्स्ट्रक्शन साईटवर मोठ्या प्रमाणात धुळ आणि बिल्डिंगमध्ये वापरले जाणारे सिमेंट उडते. या कारणामुळे जवळपास राहणार्‍या लोकांसाठी मोठी समस्या होऊ शकते. लोकांना समस्येचा सामना करावा लागू नये यासाठी हे बांधकाम हिरव्या रंगाच्या कापडाने झाकले जाते. जेणेकरून त्यामधून निघणारी धुळ, छोटे-मोठे कण, खडे बाहेर येऊ नयेत.

हिरवा रंगच का ?
तर याचे थेट उत्तर आहे हिरवा रंग दूर अंतरावरून सुद्धा दिसतो. सोबतच रात्री हा थोडा प्रकाशसुद्धा रिफ्लेक्ट करतो. यासाठी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला हिरव्या कपड्याने झाकले जाते.