साताऱ्यात थरार…. ‘ट्रॅप’ वेळी फौजदाराने एसीबीच्या दोन पोलिसांना चिरडलं

सातारा : पोलीसनामा आॅनलाईन-

सापळ्यात अडकणार हे लक्षात येताच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दोन पोलिसांना फाैजदाराने चिरडल्याची धक्कादायक घटना दहिवडीत घडली आहे. या घटनेमुळे सातारा पोलीस दलासह महाराष्ट्रात चांगलीच खळबळ उडाली असून, सतीश राजाराम दबडे (वय,५५)  असे फाैजदाराचे नाव आहे.
[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7f77ec4c-9c81-11e8-b729-bb0eaae67966′]

आज (शुक्रवारी) दहिवडी पोलीस ठाण्याचा फाैजदार दबडे याने तक्रारदार यांचा बियर बारचा परवाना रद्द करण्याचा रिपोर्ट कलेक्टर आॅफिसला न पाठवण्यासाठी  13 हजार रुपायांची लाच मागितली होती. याची माहिती एसीबीला प्राप्त झाल्यानंतर विभागाच्या पथकाने सापळा लावला होता. यावेळी सापळा लागल्याची चाहूल दबडे याला लागताच आपण सापळ्यात अडकणार हे लक्षात आल्यानंतर दबडे याने एसीबीच्या दोन पोलिसांना कारने उडवून घटनास्थळावरुन धूम ठोकली.  दरम्यान, दोन्हीं पोलिस जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.