गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मुर्तीची स्थापना कोणत्या वेळेत करावी ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लवकरच घराघरात गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. अनेकजणांना मुर्तीची स्थापना सकाळी करायची असते. जे कोणी असं करणार आहेत त्यांनी स्थापना करताना राहू काळ टाळायला हवा. गणपती बाप्पाची स्थापना करताना शुभ काळ पाहून करायला हवी. दुपारी 3.15 नंतर विष्टी करण सुरु होणार असल्याने हा काळही शुभ नाही असे दिसते. कोणत्या वेळेत गणेश मुर्तीची स्थापना करावी याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी 7.55 ते 9.30 पर्यंत राहू काळ असणार आहे. तसेच दुपारी 3.22 आणि त्यानंतर पुढे विष्टी करण असणार आहे. त्यामुळे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजताच्या दरम्यान तु्म्ही गणेश मुर्तीची स्थापना  करून विधीवत स्थापना करू शकता. याशिवाय अभिजित मुहूर्त दुपारी 12.12 ते 1.03 असणार आहे. अन्य शुभकाळ पाहण्याची तु्म्हाला आवश्यकता असणार नाही.

घराघरात बाप्पाच्या आगमनामुळे जोरदार तयारी सुरु आहे. याशिवाय गणेश मंडळं ही डेकोरेशनसाठी आणि देखाव्यांसाठी आतापासूनच तयारी करताना दिसत आहे. याशिवाय ढोल पथकांचीही तालीम जोरात सुरु आहे.

आरोग्यविषयक वृत्त –