कोरोना काळात नोकरी गेलीय ? ‘या’ स्कीमअंतर्गत मिळेल 3 महिने 50 % सॅलरी

पोलीसनामा ऑनलाइन  – मोदी सरकारने नुकतेच एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स अ‍ॅक्ट (ईएसआयसी) च्या अंतर्गत अटल विमित व्यक्ती कल्याण योजनेचा कालावधी 30 जून 2021 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकारने पेमेंटला सुद्धा नोटिफाय केले आहे. यानंतर 31 डिसेंबर 2020 पर्यंत काही शिथिलतेसह सबस्क्रायबर्सना 50 टक्के बेरोजगारी लाभ दिला जाईल. हा फायदा त्या कामगारांना मिळेल, ज्यांची 31 डिसेंबरच्या अगोदर नोकरी गेली असेल.

31 डिसेंबर 2020 च्यानंतर या स्कीम अंतर्गत नियमांमध्ये शिथिलता बंद केली जाईल. 1 जानेवारी 2021 पासून 30 जून 2021 च्या दरम्यान ओरिजनल क्रायटेरियाच्या आधारावरच सबस्क्रायबर्सला लाभ मिळू शकेल. या कालावधीत बेरोजगारी लाभ 50 टक्केच्या ठिकाणी 25 टक्केच मिळेल. या स्कीमचा लाभ संघटीत क्षेत्रातील तेच कर्मचारी घेऊ शकतात, जे ईएसआयसीने विमित आहेत आणि दोन वर्षापेक्षा जास्त काळ नोकरी केली आहे. याशिवाय आधार आणि बँक अकाऊंट डेटा बेसशी जोडलेले हवे.

जाणून घेवूयात स्कीमबाबत…

1 या स्कीमचा लाभ घेण्यासाठी विमित व्यक्ती बेरोजगार असायला हवी आणि याच दरम्यान त्यांना बेरोजगारीच्या लाभासाठी क्लेम करावा लागेल.

2 विमित व्यक्तीसाठी एक अटहीसुद्धा असेल की बेरोजगारीच्या अगोदर कमीत कमी तो दोन वर्षापर्यंत रोजगार करत असावा.

3 यासंबंधात योगदान कंपनीकडून पैसे भरले गेले पाहिजेत किंवा देय असले पाहिजे.

4 एखाद्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारचे वाईट काम केलेले असणे, तसेच पेन्शन प्रोग्रॅम किंवा ऐच्छिक सेवानिवृत्ती घेणार्‍या लोकांना या स्कीमचा लाभ मिळणार नाही.

5 विमित व्यक्तीचे आधार कार्ड आणि बँक अकाऊंट डिटेल त्यांच्या डेटाबेसशी लिंक असायला पाहिजे.

6 बेरोजगार व्यक्ती स्वताच हा क्लेम करू शकतो.

7 नोकरी गेल्यानंतर 30 दिवसांपासून 90 दिवसांच्या दरम्यान क्लेम करावा लागेल.

8 क्लेम ऑनलाइन सबमिट करावा लागेल. ज्यानंतर विमित व्यक्तीच्या बँक खात्यात क्लेमची रक्कम पेमेंट केली जाते. क्लेम व्हेरिफाय झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत हे पेमेंट करण्यात येईल.