… म्हणून सीमेवर सतत ‘बेभान’ होतोय ‘ड्रॅगन’, चीनबद्दल माजी PM अटल बिहारी वायपेयींच्या निकटवर्तीयानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारत आणि चीनमध्ये 15 जूननंतरचा लाईन ऑफ अ‍ॅक्चुअल कंट्रोल (एलएसी) वरील तणाव बहुतेक 1990 मध्ये झालेल्या कारगिल युद्धानंतरचा सर्वात मोठा सीमा वाद झाला आहे. सोमवारी गलवान खोर्‍यात झालेल्या हिंसक हल्ल्यात भारताचे 20 सैनिक शहीद झाले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे निकटवर्ती सहकारी असलेले शक्ती सिन्हा यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, चीनच्या 2049 च्या मास्टर प्लानसमोर भारत सर्वात मोठा अडथळा आहे. यासाठीच तो एलएसीवर इतक्या मोठ्याप्रमाणात समस्या निर्माण करत आहे.

2049 पर्यंत चीनला व्हायचेय बादशाह

वडोदरा येथील एमएस युनिव्हर्सिटीच्या अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिसी रिसर्च अ‍ॅण्ड इंटरनॅशनल स्टडीजचे डायरेक्टर शक्ती सिन्हा यांनी न्यूज एटीन वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले की, चीन मागील एक दशकादरम्यान जास्त आक्रमक झाला आहे. त्याला वाटते की, जागतिक स्तरावर आपली स्थिती मजबूत करण्याची वेळ आली आहे.

तो संपूर्ण जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडत आहे. त्यांनी म्हटले की, चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे स्वप्न आहे की, चीनला 2049 पर्यंत पूर्णपणे विकसित, श्रीमंत आणि शक्तीशाली करायचे. चीनला जागतिक इतिहासात सर्वात शक्तीशाली व्हायचे आहे. शक्ती सिन्हा यांनी 2049 ला जिनपिंग यांचा मास्टर प्लान म्हटले आहे.

स्वप्नपूर्तीत भारत सर्वात मोठी अडचण

त्यांचे म्हणणे आहे की, भारत त्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. चीनच्या महात्वाकांक्षी बेल्ट अ‍ॅण्ड रोड प्रोजेक्टवरून भारताने सर्वप्रथम धोक्याची घंटी वाजवली होती, याची आठवण त्यांनी करून दिली. भारताची लोकशाही सुद्धा चीनसाठी धोकादायक आहे. भारताकडून एलएसीवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या निर्मितीला वेग आला आहे. चीन, भारताच्या याच पावलांमुळे खुप चिंतेत आहे. याच कारणामुळे चीन आता सीमेवर आक्रमक झाला आहे. सिन्हा म्हणाले, लाईन ऑफ अ‍ॅक्चुअल कंट्रोलबाबत बोलायचे तर आधीच सर्व ठरलेले आहे. सीमेवर दोन्हीकडे लष्करासाठी सुद्धा प्रोटोकॉल आहे. परंतु, चीनला जमीन बळावण्याची सवय असल्याने वारंवार सीमेवर तो आक्रमक प्रयत्न करत आहे.

दुसर्‍या देशांवर कब्जा करण्याची निती

त्यांनी म्हटले की, भारताला पुढे जाऊ द्यायचे नाही ही 1950 पासूनच चीनची निती राहीली आहे. जर 1962 ची गोष्ट सोडली तर 1967 मध्ये भारतीय सैन्याने त्यांना धडा शिकवला होता. गलवान खोर्‍यावर चीनने दावा करणे आणि पीएम मोदींनी कोणतेही अतिक्रमण झाले नाही, असे म्हणणे यावर शक्ती सिन्हा म्हणाले, पीएम मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत केलेल्या व्यक्तव्याचे अधिकृत व्हर्जन येईपर्यंत वाट पहावी लागेल. त्यांनी नेमके काय म्हटले हे तेव्हाच समजेल. परंतु हे स्पष्ट आहे की, भारत आता चीनच्या समोरून मागे हटण्यास तयार नाही. डोकलाम याबाबचा पुरावा आहे.

शुक्रवारी चीनी परराष्ट्र मंत्रालयाकडून डेली मीडिया ब्रीफिंगमध्ये प्रवक्ता झाओ लिजियान यांनी म्हटले की, अनेक वर्षांपासून चीनी लष्कराचे जवान या भागात गस्त घालतात. हा दावा चीनकडून अशावेळी केला गेला आहे, जेव्हा 24 तास आधी म्हणजे गुरूवारी भारताने गलवान खोर्‍यावरील चीनी दावा फेटाळला होता.

प्रवक्ता झाओ लिजियान यांनी एक-एक करून गलवान खोर्‍यात झालेल्या हिंसेबाबत मीडियाला माहिती दिली. त्यांचे वक्तव्य शुक्रवारी रात्री उशीरा भारतातील चीनी दूतावासाकडून वेबसाईटवर जारी करण्यात आले आहे. मंगळवारी पीपल्स लिब्रेशन आर्मी (पीएलए) च्या वेस्टर्न कमांडकडून वक्तव्य जारी करण्यात आले होते. या वक्तव्यात म्हटले होते की, गलवान नदी खोर्‍याचे सार्वभौमत्व नेहमीच आमचे राहीले आहे.