आडवाणींनी वाजपेयींना धमकी दिल्याने मोदींची खुर्ची वाचली

भोपाळ : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलीनंतर अटल बिहारी वाजपेयी हे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पदावरून हटवणार होते. मात्र लालकृष्ण आडवाणी यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा देण्याची धमकी दिल्याने मोदींची खुर्ची वाचली. असा दावा माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात राहिलेले माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी आज केला आहे.

भोपाळ मधील एका कार्य़क्रमानंतर यशवंत सिंन्हा यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हा दावा केला. गुजरातमधील सांप्रदायीक दंगलीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा देयला हवा असे अटल बिहारी वाजपेयी यांना वाटत होते. दरम्यान, गोव्यामध्ये झालेल्या भाजपाच्या कार्यसमितीच्या बैठीकीमध्ये वाजपेयी यांनी मोदींनी राजीनामा दिला नाहीत सरकार बर्खास्त करू असा पवित्रा घेतला होता. यावर भाजपामध्ये विचार विनिमय झाला. वाजपेयी यांच्या निर्णयाला आडवाणी यांनी विरोध करत मोदी सरकार बर्खास्त केले तर मी गृहमंत्री पदाचा राजीनामा देण्याची धमकी दिली. यामुळे मोदींचे गुजरातचे मुख्यमंत्री पद राहिल्याचे, सिन्हा यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधताना सिन्हा म्हणाले, आत्ताची भाजपा ही वाजपेयी-अडवाणी यांची भाजपा राहिलेली नाही. वाजपेयी यांच्यावेळी विचारधारेचा कोणताही संघर्ष नव्हता. तो आत्ताच्या भाजपामध्ये दिसून येत नाही. आज देशामध्ये असहिष्णुताचे वातावरण होत आहे. यंदाच्या निवडणुकीतच्या प्रचारात भाजपाने पाकिस्तानचा मुद्दा उचलून धरला हि दुर्दैवाची बाब आहे.

तसेच जम्मु-काश्मिर मधील दोन मुद्यांबाबत प्रामुख्याने बोलले जात आहे. ते म्हणजे कलम ३७० आणि ३५ ए. या दोन मुद्यावरून देशाचे दोन भाग करण्याचे काम केले जात आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली असून देशात बेरोजगारी वाढली असल्याचा आरोप सिन्हा यांनी भाजपावर केला.