Atal Pension Yojana | मोदी सरकारची ‘ही’ स्कीम पती-पत्नीसाठी ‘फिक्स्ड इन्कम’चे माध्यम, दरमहिना मिळतील रू. 10,000; जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Atal Pension Yojana | जर तुम्ही गुंतवणुक करण्याची योजना (Investment planning) आखत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची असू शकते. अनेक लोकांना कमी गुंतवणूक करून गॅरंटेड लाभ मिळवायचा असतो. तुम्ही सुद्धा कमी गुंतवणुकीत पेन्शनच्या गॅरंटीसाठी अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana) पैसे गुंतवू शकता. हा वृद्धत्वासाठी चांगला पर्याय (APY) आहे.

 

मोदी सरकारच्या (Modi Government) या योजनेंतर्गत पती-पत्नी दोघांना फायदा होऊ शकतो. या योजनेत दोघे वेगवेगळी गुंतवणूक करू शकतात. सरकार अटल पेन्शन (Atal Pension Yojana) योजनेंतर्गत 60 वर्षानंतर 1000 ते 5000 रुपये महिना पेन्शनची गॅरंटी देते. सरकारच्या या योजनेत वयाच्या 40 वर्षापर्यंत व्यक्ती अर्ज करू शकतो.

 

60 व्या वर्षानंतर वार्षिक मिळतील 60,000 रुपये पेन्शन

60 व्या वर्षानंतर मिळेल 60,000 रुपए पेन्शन
योजनेंतर्गत अकाऊंटमध्ये दरमहिना एक ठराविक योगदान केल्यानंतर रिटायर्मेंटनंतर 1 हजार रुपयांपासून 5 हजार रुपये मंथलीपर्यंत पेन्शन मिळेल. सरकार दर 6 महिन्यात केवळ 1239 रुपये गुंतवणूक केल्यास 60 वर्षाच्या वयानंतर आयुष्यभर 5000 रुपये महिना म्हणजे 60,000 रुपये वार्षिक पेन्शनची गॅरंटी देत आहे.

 

दरमहिना द्यावे लागतील 210 रुपये
योजनेत सहभागी होण्यासाठी आपल्या मासिक कमाईतील एक छोटा भाग Atal pension yojana मध्ये गुंतवावा लागेल. जर योजनेचा लाभ घेणार्‍या व्यक्तीचे वय 18 वर्ष आहे तर त्यास 210 रुपये महिना गुंतवणूक करावी लागेल. तर, 39 वर्षापेक्षा कमी वयाचे पती-पत्नी वेगवेगळे या योजनेत 420 रूपये जमा करून 60 वर्षाच्या वयानंतर दरमहिना 10,000 रूपये पेन्शन घेऊ शकतात.

कमी वयात सहभागी झाल्यास जास्त फायदा
समजा जर 5 हजार पेन्शनसाठी तुम्ही 35 च्या वयात सहभागी झालात तर 25 वर्षापर्यंत दर 6 महिन्यात 5,323 रुपये जमा करावे लागतील. अशावेळी तुमची एकुण गुंतवणूक 2.66 लाख रुपये होईल, ज्यावर तुम्हाला 5 हजार रुपये मंथली पेन्शन मिळेल. तर 18 व्या वर्षी सहभागी झाल्यास तुमची एकुण गुंतवणूक केवळ 1.04 लाख रुपयेच होईल.

 

सरकारी योजनेशी संबंधीत इतर गोष्टी

तुम्ही पेमेंटसाठी 3 प्रकारचे प्लान निवडू शकता, मंथली गुंतवणूक, तिमाही गुंतवणूक किंवा सहामाही गुंतवणूक.

इन्कम टॅक्सच्या सेक्शन 80c च्या अंतर्गत यामध्ये टॅक्स सूटचा फायदा मिळतो.

एका सदस्याच्या नावाने केवळ 1 अकाऊंट उघडेल.

जर 60 वर्षाच्या अगोदर किंवा नंतर सदस्याचा मृत्यू झाल्यास, पेन्शनची रक्कम पत्नीला मिळेल.

जर सदस्य आणि पत्नी दोघांचा मृत्यू झाला तर सरकार नॉमिनीला पेन्शन देईल. (Atal Pension Yojana)

 

Web Title :- Atal Pension Yojana | atal pension yojana husband wife both get 10k rupees in this scheme check how details here Modi Government schemes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

IND vs NZ | 17 नोव्हेंबर, 17 नंबरची जर्सी, 17 चेंडूवर 17 धावा, 2017 मध्ये पदार्पण; तुम्हाला माहित आहे का Love 17 असलेल्या खेळाडूचे नाव

Belly and Waist Fat | महिनाभरात एकाचवेळी कमी होईल पोट आणि कंबरेची चरबी, केवळ ‘हे’ 3 व्यायाम नियमित करा; जाणून घ्या

Japanese long lives | गोड पदार्थ आणि चपाती वर्ज्य, जाणून घ्या जपानी लोकांच्या दिर्घायुष्याची ‘ही’ 10 रहस्य