Atal Pension Yojana मध्ये दरमहिना 210 रुपये जमा करा, 10 हजार रुपये मंथली पेन्शन मिळवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Atal Pension Yojana | निवृत्तीनंतर बहुतेक लोकांना आर्थिक सुरक्षेची चिंता असते. ही चिंता आयुष्यात येऊ नये, यासाठी पेन्शन प्लानिंग वेळेत करणे गरजेचे आहे. तुम्हालाही निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा हवी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. (Atal Pension Yojana)

 

येथे तुम्हाला सरकारच्या अटल पेन्शन योजनेची (Atal Pension Yojana) माहिती दिली जात आहे, ज्यामध्ये पती-पत्नी स्वतंत्र खाते उघडून 10,000 रुपये मासिक पेन्शन मिळवू शकतात.

 

अटल पेन्शन योजना ही एक सरकारी योजना आहे, ज्यामध्ये तुमच्याकडून होणारी गुंतवणूक तुमच्या वयावर अवलंबून असते. या योजनेअंतर्गत, तुम्हाला किमान मासिक पेन्शन रु. 1,000, रु. 2000, रु. 3000, रु. 4000 आणि कमाल रु. 5,000 मिळेल. ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे.

 

सरकार दर 6 महिन्यांनी केवळ 1239 रुपये गुंतवल्यास 60 वर्षानंतर प्रति महिना 5000 रुपये म्हणजेच वार्षिक 60,000 रुपये आजीवन पेन्शनची हमी देते.

 

पती-पत्नी दोघांनीही गुंतवणूक केल्यास वर्षाला 1.2 लाख रुपये पेन्शन मिळेल. या योजनेत ठेवीदारांना 60 वर्षांनंतर पेन्शन मिळू लागते.

 

असे जमा करू शकता
18 ते 40 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी जास्तीत जास्त 5000 रुपये मासिक पेन्शनसाठी या योजनेत सामील झालात, तर तुम्हाला दरमहा फक्त 210 रुपये द्यावे लागतील.

 

हीच रक्कम दर 3 महिन्यांनी जमा करायची असल्यास 626 रुपये आणि 1,239 रुपये 6 महिन्यांसाठी भरावे लागतील. जर तुमचे वय 18 वर्षे असेल आणि तुम्हाला या योजनेतून 1000 रुपये मासिक पेन्शन हवे असेल तर तुम्हाला फक्त 42 रुपये मासिक द्यावे लागतील.

कमी वय, जास्त नफा
समजा तुम्ही वयाच्या 35 व्या वर्षी 5,000 रुपये पेन्शनसाठी या योजनेत सामील झालात, तर 25 वर्षापर्यंत दर 6 महिन्यांनी तुम्हाला 5,323 रुपये जमा करावे लागतील. अशा परिस्थितीत तुमची एकूण गुंतवणूक 2.66 लाख रुपये असेल, ज्यावर तुम्हाला 5,000 रुपये मासिक पेन्शन मिळेल.

 

दुसरीकडे, जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी त्यात सामील झालात तर तुमची एकूण गुंतवणूक फक्त 1.04 लाख रुपये असेल.

 

पेमेंटसाठी तीन पर्याय आहेत. तुम्ही मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही रक्कम जमा करू शकता.

अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणार्‍यांना 1.5 लाख रुपयांपर्यंत कर लाभ मिळतो.

एका सदस्याच्या नावाने फक्त एकच खाते उघडले जाईल.

जर सदस्याचा मृत्यू 60 वर्षापूर्वी किंवा नंतर झाला तर पत्नीला पेन्शनची रक्कम दिली जाईल.

जर पती-पत्नी दोघांचा मृत्यू झाला, तर नॉमिनीला सरकार पेन्शन देईल.

 

Web Title :- Atal Pension Yojana | atal pension yojana married people will get rupees 10000 pension monthly

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना थेट आव्हान; म्हणाले – ‘ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा’

 

Maharashtra Political Crisis | …म्हणून एकनाथ शिंदे गटाची न्यायालयात धाव

 

Shivsena MP Sanjay Raut | ‘आता वेळ निघून गेलीय, लढाई आम्हीच जिंकणार’; संजय राऊतांचा शिंदे गटाला इशारा