Atal Pension Yojana | केवळ 7 रुपये प्रतिदिवस गुंतवणुकीने दर महिना मिळेल 5,000 रुपयांचा फायदा, फक्त करा ‘हे’ काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करणे एक चांगली सवय आहे. परंतु कोणत्याही ठिकाणी गुंतवणुकीपूर्वी पूर्ण माहिती आवश्य घेतली पाहिजे. जर तुम्ही सुद्धा अशाप्रकारच्या सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana- APY) पैसे लावू शकता. अटल पेन्शन योजना 2015 मध्ये असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या लोकांसाठी सुरू करण्यात आली होती. परंतु या योजनेत 18 ते 40 वर्षाचा कुणीही भारतीय नागरिक गुंतवणूक (Investment) करून पेन्शनचा लाभ घेऊ शकतो, ज्यांच्याकडे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) अकाऊंट आहे. या योजनेत 60 वर्षानंतर पेन्शन मिळण्यास सुरूवात होते. atal pension yojana invest only 7 rupees and get 5000 rupees per month check how

काय आहे अटल पेन्शन योजना?

अटल पेंशन स्कीममध्ये तुम्ही केलेली गुंतवणूक तुमच्या वयावर अवलंबून असते.
या योजनेंतर्गत किमान 1,000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये आणि कमाल 5,000 रुपये मासिक पेन्शन (Monthly pension) मिळते.
या पेन्शनसाठी योजनेसाठी रजिस्ट्रेशन करायचे असेल तर तुमच्याकडे सेव्हिंग्ज अकाऊंट, आधार नंबर आणि एक मोबाइल नंबर असावा.

अशाप्रकारे दरमहिना मिळेल 5000 रु पेन्शन

जर एखादी व्यक्ती 18 व्या वर्षी या योजनेत सहभागी होत असेल आणि वयाच्या 60 व्या वर्षानंतर 1,000 रुपये मासिक पेन्शन पाहिजे असेत तर त्यास 60 वर्षाच्या वयापर्यंत प्रत्येक महिन्याला 42 रुपये खर्च करावे लागतील.
जर, या व्यक्तीला 5,000 रुपये मासिक पेन्शन हवी असेल तर त्यास 60 वर्षांचा होईपर्यंत प्रति महिना 210 रुपये जमा करावे लागतील.
या स्कीम अंतर्गत 1,000 रुपये, 2,000 रुपये, 3,000 रुपये, 4,000 रुपये आणि 5,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळते.

टॅक्स बेनिफिट (Tax benefit)

या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला एनपीएसप्रमाणे समान कर सवलत मिळते.
आयकर कायदा, कलम 80 सीसीडी (1बी) अंतर्गत या योजनेत करात सवलत मिळते.

APY चे डेथ बेनिफिट्स

अटल योजनेच्या पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यानंतर रक्कम काढण्यासाठी किंवा पेन्शन योजना सुरू ठेवण्यासाठी जी बँक किंवा टपाल कार्यालयात खाते आहे तिथे संपर्क साधा.
सोबतच पॉलिसी धारकाचे मुळ मृत्यू प्रमाणपत्र, नॉमिनीचे केवायसी, नॉमिनीच्या बँक खात्याची माहिती, नॉमिनीचे खातेधारकाशी असलेल्या संबंधाचा पुरावा घेऊन जा.
येथे बँक शाखा तुमच्याकडून आवश्य माहिती मागेल आणि व्हेरिफेकेशननंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Web Title : atal pension yojana invest only 7 rupees and get 5000 rupees per month check how

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Gold Price Today | सोनं पुन्हा 49 हजारपर्यंत, चांदी मात्र स्थिर; जाणून घ्या आजचे दर

Natural Ways To Clean Lungs | जाणून घ्या औषधाशिवाय फुफ्फुस स्वच्छ करण्याचे ‘हे’ 6 नैसर्गिक मार्ग

Pune Crime News | एटीएम सेंटरमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची 5 लाखाची फसवणूक