मोदी सरकारच्या ‘या’ स्कीममध्ये दरमहा फक्त 269 रूपये भरा, मिळत राहतील 5 हजार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने २०१५ मध्ये अटल पेन्शन योजना (एपीवाय) सुरू केली होती. या योजनेशी कोट्यवधी देशवासीय जोडले आहेत. ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. ही योजना १००० ते ५००० पर्यंतचे पेन्शन देण्याची असून योजनेची ओव्हरड्राफ्ट सुविधा १०,००० रुपये आहे. खात्यांचा अपघात विमा २ लाख आहे. ही योजना राष्ट्रीय पेन्शन योजनेमार्फत फंड नियामक आणि विकास प्राधिकरण द्वारे चालवली जात आहे.

तर कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे असून या योजनेत दरमहा २६९ रुपये भरल्यास महिन्याला पाच हजार रुपये पेन्शनची व्यवस्था होते. या योजनेचा फायदा कसा घेता येईल, ते जाणून घेऊ: –

कसे मिळणार ५ हजार रु. महिन्याला?
एपीवाय मध्ये जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या २१ व्या वर्षापासून दरमहा २६९ रु. ची निवृत्तीच्या वयापर्यंत गुंतवणूक केली तर महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन दिली जाते. तसेच दर तीन महिन्याच्या हिशोबाने गुंतवणूकदारास ८०२ रुपये भरावे लागतात. त्याचबरोबर अर्धवार्षिक १,५८८ रुपये आहे आणि वार्षिक ३१७६ रुपये प्रीमियम भरावा लागतो. ६० वयानंतर तुमच्या खात्यात दरमहा ५ हजार रुपये येत राहतील. तुम्हाला ही गुंतवणूक ३९ वर्षे करावी लागेल.

या योजनेत गुंतवणूक करणार्‍या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, पती व पत्नीचा मृत्यू झाल्यास मुलांना पेंशन देण्याची तरतूद आहे. आयकर कलम ८० सीसीडी अंतर्गत कर सूट मिळण्याचा देखील एक फायदा आहे. एका सदस्याच्या नावाने केवळ एकच खाते उघडता येते. जर तुम्हालाही अटल पेन्शन योजनेत सामील व्हायचे असेल तर अनेक बँकांमध्ये खाते उघडण्याची सुविधा आहे.