दररोज 7 रूपये ‘बचत’ करा अन् मिळवा 5 हजाराची पेन्शन, मोदी सरकारच्या ‘या’ स्कीमचा फायदा घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रातील मोदी सरकारने सुरु केलेल्या अटल पेंशन योजनातील सदस्यांची संख्या आता 1.9 कोटी इतकी झाली आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना दिलासा देण्यासाठी सरकारने ही योजना सुरु केली असून तुम्ही या योजनेत 7 रुपये वाचवून वयाच्या 60 वर्षानंतर तुम्ही महिन्याला 5,000 पेन्शन मिळवू शकता. ऑक्टोबरपर्यंत 36 लाख जणांनी याचा फायदा घेतला असून यामध्ये ३३ टक्यांची वाढ दिसून आली आहे. या योजनेच्या 36 लाख खात्यांमध्ये 27.5 लाख खाते सार्वजनिक बँकामध्ये असून 5.5 लाख खाते ग्रामीण बँकांमध्ये असून जवळपास 3 लाख खाते हे खासगी बँकांमध्ये आहेत.

SBI मध्ये सर्वाधिक खाते
या योजनेमध्ये SBI मध्ये सर्वाधिक खाती उघडण्यात आली असून 11.5 लाख अटल पेंशन खाती या बँकेमध्ये उघडण्यात आली आहेत. त्यानंतर कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडियाचा नंबर असून ग्रामीण बँकांमध्ये बडोदा उत्तरप्रदेश ग्रामीण बँक,दक्षिण बिहार ग्रामीण बँक आणि आंध्र प्रदेश ग्रामीण बँकेमध्ये सर्वाधिक खाते आहेत. तर एयरटेल पेमेंट बँकेत 1.8 लाख पेंशन खाते असून मार्च 2020 पर्यंत 2.25 कोटी नागरिकाना आणि कामगारांना जोडण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत.

वयोमानाची मर्यादा ?
या योजनेत वयाच्या 18 व्या वर्षांपासून ते 40 व्या वर्षापर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता. मात्र ज्या कामगारांना आयकर भरावा लागत नाही , अशा व्यक्तीच यामध्ये सहभागी होऊ शकतात.

किती मिळणार पेन्शन ?
तुम्ही गुंतवणूक किती करता यावर तुमची पेन्शन अवलंबून असणार असून कमीतकमी 1 हजार रुपये तर जास्तीत जास्त 5 हजार रुपये तुम्हाला पेन्शन मिळू शकणार आहे.

मृत्यूनंतरही मिळणार पेन्शन
या योजनेत केवळ तुम्ही जिवंत असेपर्यंत पेंशन मिळणार नसून तुमच्या मृत्यूनंतर देखील तुमच्या परिवाराला याचा लाभ मिळणार आहे. वयाच्या 60 वर्षाच्या आत तुमचा मृत्यू झाल्यास जर तुमच्या पत्नीने यामध्ये पैसे जमा करणे सुरु ठेवण्यास तिला या पेंशन योजनेचा लाभ मिळू शकनार आहे.

Visit : Policenama.com