फायद्याची गोष्ट ! दररोज फक्त 7 रूपये ‘बचत’ करा अन् महिन्याला मिळवा ‘इतकी’ पेन्शन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवृत्तीनंतर प्रत्येक महिन्याला आपल्याला ठराविक पेन्शन मिळावी असे सर्वानाच वाटत असते. भारत सरकार अशी पेन्शन मिळवण्याची संधी तुमच्यासाठी अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून घेऊन आले आहे. ही योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांकरिता आहे. दरमहा पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला अटल पेन्शन योजना फायदेशीर ठरू शकते. या योजनेचे संचालन पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे केले जाते. या योजनेद्वारे भरावयाची रक्कम देखील खूपच कमी आहे. पण याचे फायदे मात्र निश्चितच समाधानकारक आहेत. चला जाणून घेऊया या योजनेबद्दल…

ही योजना 18 ते 40 वयोगटातील लोकांसाठी आहे. या योजनेंतर्गत तुम्ही दर महिन्याला पेन्शन स्वरूपात 1 ते 5 हजार रुपये मिळवू शकते. या योजनेचा प्रिमियम (हफ्ता) हे निश्चित करतो की निवृत्तीनंतर तुम्हाला किती पेन्शन हवी आहे व योजनेत सहभागी होताना तुमचे वय किती होते. या योजनेचा प्रिमियम मासिक, तिमाही आणि सहामाही असतो.

योजनेत सहभागी होताना वय 18 असल्यास :
जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सहभागी झाला तर वयाच्या 60 वर्षांनतर तुम्हाला महिन्याला 1 हजार रुपये पेन्शनसाठी दर महिन्याला 42 रुपये हफ्ता भरावा लागेल. 5 हजार रुपये पेन्शनसाठी तुम्हाला दर महिन्याला 210 रुपये जमा करावे लागतील.

योजनेत सहभागी होताना वय 40 असल्यास
जर तुम्ही तुमचे वय 40 असेल तर 1 हजार रुपये पेंशनसाठी तुम्हाला महिन्याला 291 रुपये आणि 5 हजार रुपये पेंशनसाठी महिन्याला 1,454 रुपये भरावे लागतील. या काळात जर व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला 8.5 लाख रुपये मिळतील.

व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला मिळेल रक्कम
3 हजार रुपये गॅरेंडेट रिटर्नसाठी हफ्त्याची रक्कम 126 रुपये ते 792 रुपये असेल. या अंतर्गत व्यक्तीच्या मृत्यूनंतर नॉमिनीला 5.1 लाख रुपये एकेरी रक्कम दिली जाईल. 4 हजार रुपये पेंशनसाठी 18 ते 39 वयोगटातील व्यक्तींसाठी 168 रुपये ते 1,054 रुपये मासिक हफ्ता असू शकतो. तसेच, व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला 6.8 लाख रुपये मिळतील.