Atal Pension Yojana | मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत दर महिना मिळतील 5000 रुपये, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Atal Pension Yojana | केंद्र सरकारने आता कमी गुंतवणूकीत रिटायर्मेंटनंतर दर महिना पेन्शन गॅरंटी (Pension Guarantee) साठी अटल पेन्शन योजना (APY) सुरू केली आहे. आता अटल पेन्शन योजनेंतर्गत सरकार सरकार 1000 ते 5000 रुपये महिना पेन्शन गॅरंटी देते. atal pension yojana you will get 5000 rupees every month in this scheme of government know how to take advantage

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

कमाल वय वाढवण्याची शिफारस
सरकारच्या या स्कीममध्ये 40 वर्षापर्यंतच्या वयाचा व्यक्ती अर्ज करू शकतो. अटल पेन्शन योजनेचा हेतू प्रत्येक घटकाला पेन्शनच्या कक्षेत आणण्याचा आहे. मात्र, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने सरकारकडून अटल पेन्शन योजनेंतर्गत कमाल वय वाढवण्याची शिफारस केली आहे.

18 वर्षाच्या वयात दरमहिना केवळ 42 रुपये द्या
अटल पेन्शन योजनेंतर्गत अकाऊंटमध्ये दरमहिना योगदान केल्यास रिटायर्मेंटनंतर मासिक पेन्शन मिळेल. सरकार दर 6 महिन्यात केवळ 1,239 रुपयांच्या गुंतवणुकीवर 60 वर्षाच्या वयानंतर जीवनभर 5000 रुपये महिना म्हणजे 60,000 रुपये वार्षिक देते.

18 व्या वर्षी सुरूवात केल्यास जास्त लाभ
सध्याच्या नियमानुसार, जर 18 वर्षाच्या वयात योजनेतून कमाल 5 हजार रुपये मासिक पेन्शनसाठी सहभागी झालात तर दर महिना 210 रुपये द्यावे लागतील. जर हे पैसे दर तीन महिन्यांनी दिले तर 626 रुपये भरावे लागतील. महिन्यात 1,000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी जर 18 वर्षाच्या वयात गुंतवणुक सुरू केली तर दर महिना केवळ 42 रुपये द्यावे लागतील.

लवकर सहभागी झाल्यास, कमी गुंतवणूक
5000 पेन्शनसाठी 35 वर्षाच्या वयात गुंतवणूक सुरू केली तर 25 वर्षापर्यंत प्रत्येक 6 महिन्यात 5,323 रुपये जमा करावे लागतील. म्हणजे एकुण गुंतवणूक 2.66 लाख रुपये होईल.

ज्यावर 5 हजार रुपये मासिक पेंशन मिळेल. तर, 18 वर्षाच्या वयात सहभागी झाल्यास एकुण गुंतवणूक केवळ 1.04 लाख रुपये होईल म्हणजे एकाच पेन्शनसाठी सुमारे 1.60 लाख रुपये जास्त गुंतवणुक करावी लागेल.

अटल पेन्शन योजनेची वैशिष्ट्य

1.पैसे भरण्यासाठी 3 प्रकारचे मासिक, तिमाही किंवा सहामाही प्लॅन.

2. इन्कम टॅक्स सेक्शन 80सीसीडी अंतर्गत टॅक्स सूट.

3.एका सदस्याच्या नावाने केवळ एकच अकाऊंट.

4.जर 60 वर्षापूर्वी किंवा नंतर सदस्याचा मृत्यू झाला तर पेन्शन पत्नीला मिळेल.

5. सदस्य आणि पत्नी दोघांचा मृत्यू झाला तर पेन्शन नॉमिनीला मिळेल.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : atal pension yojana you will get 5000 rupees every month in this scheme of government know how to take advantage

हे देखील वाचा

Pune Crime News | मोक्क्यातील सराईत गुन्हेगार विवेक शेवाळे गजाआड

Pune Crime News | पुण्यातील खळबळजनक घटना ! तपासासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांवर जमावाचा प्राणघातक हल्ला; पुण्यात दीडशे जणांवर FIR दाखल

Pune Crime News | शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्यास पुण्यात अटक

राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे संकट; 21 रुग्ण आढळले; मुंबईकरांना मात्र दिलासा !

रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आज काय करणार ‘नवीन घोषणा’ ! आजच्या AGM मध्ये 5जी ची घोषणेचा कयास