मोदी सरकारच्या ‘या’ स्कीममध्ये दररोज फक्त 7 रूपये बचत करून मिळवा 60 हजार रूपये पेन्शन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकार असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना प्रतिमहिना १ ते ५ हजार रुपयांपर्यंत पेन्शन देत आहे. १८ ते ४० वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती अटल पेन्शन योजना खाते उघडू शकते. या सरकारी योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत जितक्या लवकर गुंतवणूक केली जाईल तितका निधी जमा होतो.

२५ व्या वर्षापासून दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कोणत्याही २५ वर्षांच्या व्यक्तीला या योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर त्यांना दरमहा केवळ ३७६ रुपये गुंतवावे लागतील. अशाप्रकारे वयाच्या २५ व्या वर्षापासून दरमहा फक्त ३७६ रुपये जमा करत वयाच्या ६० वर्षानंतर दरमहा ५ हजार रुपये पेन्शन मिळू शकते.

दररोज ७ रूपयांची गुंतवणूक केल्यानेही मिळू शकते ५ हजार रुपये पेन्शन
या खात्यात वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत गुंतवणूक करावी लागेल. ६० वर्षानंतर त्यांना दरमहा ५ हजार रुपये पेन्शन म्हणून मिळतील. जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या १८ व्या वर्षी दरमहा २१० रुपयांची गुंतवणूक केली, तर ६० व्या वर्षाला त्यांना ५ हजार रुपयांची पेन्शन मिळेल.

या योजनेत १८ वर्ष दररोज ७ रुपये गुंतवणूक केल्याने ६० वर्षानंतर ६० हजार रुपये वार्षिक पेन्शन मिळेल.

अटल पेन्शन योजनेसाठी कोठे खाते उघडू शकता?
या योजनेतील पेन्शनरचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पती/पत्नीलाही याचा लाभ देण्याची तरतूद असून मुलांना देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेचे एक वैशिष्ट्य म्हणजे आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत या योजनेत गुंतवणूक केल्यास कर लाभ देखील मिळतो.

मात्र, एखादी व्यक्ती केवळ एकच अटल पेन्शन खाते उघडू शकते. ते कोणत्याही सरकारी बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये उघडता येते.