Atal Pension Yojna च्या अंतर्गत पती-पत्नीला दरमहिना 10,000 रुपयांची पेन्शन, जाणून घ्या वैशिष्ट्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Atal Pension Yojna | प्रत्येक पगारदार किंवा लहान व्यावसायिक व्यक्ती निवृत्तीचे नियोजन करून वाटचाल करत असतो. लोक वृद्धापकाळाच्या खर्चाबाबत चिंतेत असतात. त्यामुळे पेन्शनचे नियोजन आवश्य करतात. अशावेळी अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojna) तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. कमी गुंतवणुकीत पेन्शनची गॅरंटी देण्यासाठी ही योजना जास्त चांगली वाटते.

 

अटल पेन्शन योजनेचा उद्देश प्रत्येक स्तराला पेन्शनच्या कक्षेत आणणे आहे. या योजनेअंतर्गत पती – पत्नी दोघांनाही 10 हजार रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळू शकते. अटल पेन्शन योजनेंतर्गत, सध्या, 60 वर्षांनंतर, सरकार दरमहा 1000 ते 5000 रुपये पेन्शनची हमी देते. म्हणजेच वर्षाला तुम्हाला 60,000 रुपये पेन्शन मिळेल.

 

अर्ज वयोमर्यादा
जर पती – पत्नी दोघेही गुंतवणूक करत असतील तर दोघांनाही पेन्शन मिळू शकते. म्हणजेच, जर तुम्ही 10 हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला वार्षिक 1,20,000 रुपये आणि मासिक 10,000 रुपये पेन्शन मिळेल.

सरकारच्या या योजनेत 40 वर्षांपर्यंतची व्यक्ती अर्ज करू शकते. मात्र, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) सरकारला अटल पेन्शन योजना (APY) अंतर्गत कमाल वय वाढवण्याची शिफारस केली आहे. (Atal Pension Yojna)

पेन्शन 1 हजार रूपयांपासून 5 हजार रुपये पेन्शन
या पेन्शन योजनेअंतर्गत दरमहा ठराविक रक्कम जमा करावी लागते.
यानंतर निवृत्तीनंतर दरमहा 1 हजार ते 5 हजार रुपये पेन्शन मिळते.

म्हणजेच दर 6 महिन्यांनी या योजनेत फक्त 1239 रुपये गुंतवावे लागतील.
याचा परिणाम म्हणून, वयाच्या 60 व्या वर्षानंतर, सरकार दरमहा 5000 रुपये म्हणजे वार्षिक 60,000 रुपये आजीवन पेन्शनची हमी देते.

 

18 व्या वर्षी देखील सामील होऊ शकता
सध्याच्या नियमांनुसार, जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील झालात आणि कमाल 5000 रुपये मासिक पेन्शनची योजना आखल्यास, तुम्हाला दरमहा 210 रुपये द्यावे लागतील.

हेच पैसे दर तीन महिन्यांनी दिले तर 626 रुपये आणि सहा महिन्यांत 1,239 रुपये द्यावे लागतील.
मासिक 1,000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी, तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी गुंतवणूक केल्यास, तुम्हाला दरमहा 42 रुपये द्यावे लागतील.

 

Web Title :- Atal Pension Yojna | under this government scheme pension of rs 10000 per month to husband and wife

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा