फेक न्युज : अटलजींच्या अस्थींची अमेझॉनवर विक्रीची

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन 

लोक काय विकायला काढतील याचा नेम नाहीये. अमेझॉनने चक्क अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थी विकण्यास काढल्या आहे. त्यावर कहर म्हणजे, या अस्तींवर १० टक्के एवढी भरगोस सुट ही दिली आहे. असा एक फोटो सोशल मिडीयावर सध्या व्हायरल होत आहे.

[amazon_link asins=’0141982489,B00BI0J65Q’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3f7bb03e-ac4d-11e8-853a-e3adff17fe32′]

या फोटोत दाखवल्या प्रमाणे, अमेझॉनवर अटलजींच्या अस्थीसह अस्थी कलश विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे दिसते. आर्श्चयाची बाब म्हणजे या अस्थी सोबत अटलजीचे नव्हे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्याचे एक पुस्तक देण्यात येत आहे.

हा फोटो व्हायरल होतोय तो एका ट्विटर अकाउंट वरुन, हे अकाउंट आहे मायावतीच्या बहुजन समाज पार्टीचे सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या देवाशीष जररियाचे. देवाशीषने या आपल्या व्टिटवरुन मोदी सरकार वर सडकुन टिका केली आहे.

पण, मुळात ही बातमी खरी नाहीये. हे आम्ही नाही ट्विटवरुन मोदी सरकारवर हल्ला करणाऱ्या देवाशीषनेच आपल्या ट्विटरवर रिट्विट करुन सांगितले आहे. २५ ऑगस्ट रोजी देवाशीषने त्याच्यासह तेजेंदर बग्गा आणि अन्य लोकांना टैग करुन ही पोस्ट टाकली होती. जी फेक असुन फक्त मोदी सरकारवर आपला रोष व्यक्त करण्यासाठी त्यांने ही पोस्ट केल्या सारखे वाटते.

मुली म्हणजे ‘वस्तू’ ; अत्याचाराच्या घटनांमध्ये ९५ टक्के  चूक मुलींचीच

भारतीय संस्कृती मोठ्यांचा आदर – मान, संस्मान करायला शिकवते हे आपण विसरत चाल्याचे हे स्पष्ट उदाहरण आहे.

जाहीरात 

पुणे : दरोडा टाकणारी टोळी गजाआड