जगातील २ मोठया अर्थव्यवस्था ‘अमेरिका-चीन’मधील ‘ट्रेड वॉर’ शमण्याचं चिन्हं, भारताच्या व्यापारावर ‘इम्पॅक्ट’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या चीन आणि अमेरिका या बलाढ्य राष्ट्रांमध्ये बऱ्याच काळापासून सुरु असलेले ट्रेड वार (व्यापार युध्द) शमण्याची शक्यता आहे. जी-२० परिषदेत अमेरिका चीन यांची यावर संमती होऊ शकते. अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या व्यापार युद्धावर चर्चा करण्याची तयारी दोन्ही देशांनी दाखवली आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिंगपिन आणि अमेरिकेचा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे शनिवारी व्यापार युध्दावर चर्चा करण्यासाठी तयार आहेत. तर अमेरिका चीनच्या निर्यातीवर नवे शुक्ल लागू न करण्यास तयार झाली आहे.

चीन अमेरिका व्यापार युद्धाचा भारताला फायदा
हे व्यापार युद्ध थांबल्यास भारतासह जगभरातील इतर देशावर देखील यांचा परिणाम होण्याची शक्यता आहे. अशातच भारत आपल्या वस्तूंना सहज इतर देशात निर्यात करु शकतात. निर्यात वाढल्याने अर्थव्यवस्थेला आधार मिळेल. असे असले तरी अमेरिका आणि चीनच्या व्यापार युद्धादरम्यान भारत आणि चीनच्या व्यापारात मात्र वाढ झाली आहे.

समानता आणि सम्मानाच्या आधारावर दोन्ही देशांमधील चर्चा सुरु झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती जी-२० शिखर परिषदेत सांगितले की, चीनच्या राष्ट्रपतीबरोबर आमची चांगली बैठक झाली, आम्ही विविध मुद्यावर चर्चा केली. आता आम्ही पुन्हा मार्गावर येत आहोत.

अ‍ॅप्पलचा व्यापार युद्धाला विरोध
दोन्ही देशात चर्चा सुरु झाल्याने गुंतवणूक दारांना आणि अनेक कंपन्याना दिलासा मिळाला आहे. मागील काही वर्षांपासून सुरु असलेले व्यापार युध्द आता शमण्याची चिन्हे आहेत. आयफोन बनवणाऱ्या अ‍ॅप्पलने अमेरिकेच्या या व्यापार युद्धाला अनेकदा विरोध दर्शवला आहे. कारण मागील एका वर्षांपासून अ‍ॅप्पलच्या विक्रीत कमी झाली आहे.

चीनी कंपनी हुवावे वरील बॅन हटवणार
तर दुसरीकडे अमेरिकेने चीनी मोबाईन कंपनी हुवावे वर बँन लावला आहे. अमेरिकेने हुवावेवर चीन सरकारसाठी गुप्तहेरी करत असल्याचा आरोप अमेरिकेने लावला आहे. अमेरिकेने चीनी वस्तूंवर टॅरिफ १० टक्क्यांवरुन २५ टक्के केला आहे. याला विरोध म्हणून चीनने देखील अमेरिकी वस्तूंवरील शुल्क वाढवले होते.

अभिनेत्री कंगना बेघर होती तेव्हा ‘या’ अभिनेत्याने ३ महिने ‘सांभाळले’, वसुल केले १ कोटी

‘बेबी डॉल’ सनी लिओनीने बॉयफ्रेंडसोबत केले सलग ६ ‘पॉर्न’ सिनेमे

बुद्धविहार तोडल्याच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन

कांबळे दुहेरी हत्याकांडातील तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा

लहान मुलांच्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

व्यायामाचा आनंद वाढविण्यासाठी ही आहे ‘बेस्ट आयडिया’