Athang | ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘अथांग’ वेबसीरिज प्रदर्शित

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Athang | विविध विषयांवरील वेब सिरीज प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सातत्याने प्रदर्शित होत असतात. याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक गाजलेली वेब सिरीज (Web series) म्हणजे ‘रानबाजार’. आता पुन्हा एकदा प्लॅनेट मराठी प्रेक्षकांसाठी एक नवीन वेब सीरिज घेऊन येत आहे. ‘अथांग’ (Athang) या वेब सीरिजचे नाव आहे. नुकताच या वेब सीरिजचा लॉन्चिंग सोहळा पार पडला. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) देखील उपस्थिती दर्शवली होती.

 

ही वेब सीरिज प्रदर्शित होण्याआधी या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. ट्रेलर पाहताच प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडायला सुरुवात झाले होते. वाड्यात नक्की काय गुढ आहे. ही अळवत कोण आणि तिचा सरदेशमुखांची काय संबंध त्या कड्यामागील रहस्य काय असे एक ना अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडत होते. मात्र या प्रश्नांचे उत्तर त्यांच्याजवळ नव्हते आता या सर्व प्रश्नांची उत्तरे ही वेब सिरीज पाहिल्यानंतर सर्वांनाच मिळतील हे मात्र नक्की. नुकतीच प्लॅनेटवर ही वेब सिरीज प्रदर्शित करण्यात आली.

 

या वेब सिरीज मध्ये संदीप खरे, निवेदिता जोशी सराफ, धैर्य घोलप, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चौक आणि रसिका वखारकर आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

या वेब सिरीज विषयी प्लॅनेट मराठीचे प्रमुख संस्थापक अध्यक्ष बर्दापूरकर यांना विचारले असता ते म्हणाले,
“ओटीटीवर प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी पिरिऑडिक ड्रामा आहे. ज्यात खूप काही गुढ रहस्य दडलेले आहे.
जे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. ही संपूर्ण कथा प्रेक्षकांना बांधून ठेवणारी आहे.
ज्यांनी ज्यांनी ही वेब सिरीज पाहिली आहे त्यांना विचारले असता त्यांच्या प्रतिक्रिया या अशा होत्या
की, ‘अथांग’ म्हणजे ज्याचा थांग लागत नाही. अशी या वेब सिरीजची खासियत आहे.
ज्याचा प्रत्येक भाग क्षणोक्षणी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार आहे.
अथांग मधली कथा १९३० आणि १९६० च्या कालखंडातली आहे.
अथांग बघताना आपणही तो काळ जगू शकतो, हळूहळू यातील एक एक गुढ उलघडत जाईल तसतसे आपल्याला या वेब सिरीज मध्ये रस निर्माण होताना दिसेल”.
प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन निर्मित, अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत ‘अथांग’चे तेजस्विनी पंडित,
संतोष खेर निर्माते आहेत. तेजस्विनी यावेळी वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती
आता ती निर्मिती क्षेत्रात उतरली आहे.

 

Web Title :- Athang | athang marathi web series now streaming on planet marathi ott platform

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Minor Girl Rape Case | पुण्यात माजी सरपंचाचं घृणास्पद कृत्य, अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार

Uddhav Thackeray Group | ‘मातोश्री’चं किचन सांभाळते म्हणणार्‍या बाईला वैतागले म्हणत महिला नेत्याचा ठाकरेंना रामराम

Pune Crime | आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या कोरेगाव पार्क येथील ‘पब्लिक रेस्टॉरंट अँड बार’वर गुन्हे शाखेची कारवाई

Yoga Guru Ramdev Baba | रामदेव बाबांचे विधान, म्हणाले – महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही नाही घातलं तरी छान दिसतात