मोबाइलपेक्षा लवकर चार्ज होणारी पहिली स्वदेशी ‘अँड्रॉइड इलेक्ट्रिक स्कूटर’ लाँच  

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील एका स्टार्टअप कंपनीनं इलेक्ट्रिक स्कूटर तयार केली आहे. ही स्कूटर मोबाइलपेक्षा कमी वेळात चार्ज होते , असा दावा स्कूटर तयार करणाऱ्या कंपनीने केला आहे. स्कूटरमध्ये अँड्रॉइड ऑपरेटींग सिस्टम आणि बॅक गिअरसारख्या काही खास सुविधा देण्यात आल्या आहेत.

इलेक्ट्रिक वाहन बनवण्यासाठी जवळपास सर्वच कंपन्या सरसावल्या आहेत. विजेवर चालणाऱ्या दुचाकी गाड्या लाँच करण्याची तयारी अनेक कंपन्यांनी सुरू केली आहे.आथर एनर्जी या  कंपनीनं Ather S340 आणि S450 ही दोन स्कूटर्स लाँच केली आहेत.

स्कूटर्सची वैशिष्ट्ये –

 Ather S340 आणि S450 या दोन्ही स्कूटर्सची वैशिष्ट्ये म्हणजे ही मोबाइलपेक्षा लवकर चार्ज होतात. या दोन्ही स्कूटर्सची बॅटरी ५० मिनिटात ८० टक्के चार्ज होतेय, असा दावा कंपनीनं केला आहे. कंपनीनं या स्कूटर्समध्ये २.४ किलो वजनाची आवर्सची लीथियम ऑयनची बॅटरी दिली आहे. ती ५० हजार किलोमीटरपर्यंत चालू शकते. या बॅटरीला  IP67  कडून स्वीकृती मिळाली आहे. त्यामुळे या बॅटरीवर पाणी आणि धुळीचा कोणताही दुष्परिणाम होत नाही, असंही कंपनीनं स्पष्ट केले आहे.

स्कूटरची बॅटरी फुल चार्जिंग झाल्यानंतर ही स्कूटर ७५ किलोमीटरचा मायलेज देतेय. तसेच ३.९ सेकंदात ही ४० किलोमीटर प्रति तास वेग पकडू शकते, असंही कंपनीनं म्हटलं आहे. बॅलेंस ठेवण्यासाठी स्कूटरच्या मध्यभागी लॅग स्पेस बॅटरी ठेवण्यात आली आहे. स्कूटर्सच्या फ्रन्ट आणि बॅकला डीस्क ब्रेकचे फीचर दिले आहेत. या स्कूटर्सचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे याला रिक्षाप्रमाणे रिव्हर्स गिअर सुद्धा देण्यात आले आहे.


किंमत – 
S450 या स्कूटरची किंमत १ लाख २४ हजार ७५० रुपये तर  Ather S340   या स्कूटरची किंमत १ लाख ९ हजार ७५० रुपये इतकी आहे