क्रिकेटर के एल राहुल सोबत डिनर करताना दिसली अथिया शेट्टी, फोटोज वायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अथिया शेट्टी आणि के एल राहुल यांच्यातील मैत्रिची चर्चा नेहमीच होत असते. असे समजले जात आहे की दोघेजण एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, दोघांनीही या गोष्टीला अद्याप दुजोरा दिलेला नाही. अथिया आणि राहुलला अनेकदा सोबत सुट्टीला एकत्र वेळ घालवताना स्पॉट केले गेले आहे. आता पुन्हा एकदा दोघेजण सोबत दिसले आहेत.

आता अथिया शेट्टी, क्रिकेटर के एल राहुल आणि त्याच्या मित्रांसोबत डिनर करण्यासाठी आली होती. या डिनर गेट टूगेदरचे काही फोटोज क्रिकटर रॉबिन उथप्पाची पत्नी शीतलने सोशल मीडियावर शेयर केले आहेत. फोटोमध्ये तुम्ही अथिया आणि राहुलला पाहू शकता.

याशिवाय शीतलने अथिया आणि आपला फोटोसुद्धा सोशल मीडियावर शेयर केला आहे. तिने कॅपशनमध्ये लिहिले, मी काही अशा मित्रांसोबत मोठी झाली आहे जे सुरूवातीपासून माझे कुटुंब आहेत. खुप आनंदी आहे की हे कुटुंब जीवनाच्या प्रत्येक पावलावर मोठे होत आहे.

अथिया आणि राहुल अनेकदा सोबत दिसले आहेत. दोघे सोबत व्हॅकेशनवर जाताना सुद्धा दिसले आहेत.

अथिया शेट्टीच्या करियरबाबत बोलायचे तर तिने फिल्म हिरोतून 2015 मध्ये डेब्यू केला होता. फिल्मचा प्रोड्यूसर सलमान खान होता आणि तिचा हिरो सूरज पंचोली होता. मात्र, हा चित्रपट कमाल दाखवू शकला नाही.

यानंतर अथिया शेट्टी नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत फिल्म मोतीचूर चकनाचूरमध्ये दिसली होती. या फिल्ममध्ये तिच्या अभिनयाचे कौतूक झाले होते, परंतु चित्रपट चांगली कमाई करू शकला नाही आणि फ्लॉप झाला.