Tokyo Olympics | मेडल जिंकण्यापूर्वी बोट रिपेयर करण्यासाठी महिला खेळाडूने केला ‘कंडोम’चा वापर, व्हिडिओ पाहून लोक होत आहेत ‘हैराण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सध्या टोकियोमध्ये ऑलम्पिक (Tokyo Olympics) खेळ सुरू आहेत. अनेक देशांचे खेळाडू जीव ओतून मेडल जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावर सुद्धा टोकियो ऑलम्पिक 2020 शी (Tokyo Olympics) संबंधीत रंजक व्हिडिओ आणि छायाचित्र दिसत आहेत. आतापर्यंत खेळण्यात आलेल्या खेळात टॅलेंट, इमोशन, हार-पराभवाचे अनेक क्षण आले आहेत. परंतु काही क्षण असे सुद्धा आहेत ज्यांनी सोशल मीडियावर वादळ आणले आहे.

असाच ऑलम्पिकमधून वायरल होत असलेला एक लेटेस्ट व्हिडिओ ऑस्ट्रेलियन अ‍ॅथलीट जेसिका फॉक्स (Jessica Fox) चा आहे, जी कॅनोईंग (canoeing) मध्ये पार्टिसिपेट करत आहे.
27 वर्षांच्या जेसिकाने अगोदर महिला C1 ऑलम्पिक फायनलमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे.
तिने 6 व्या दिवशी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून सुवर्ण पदक आपल्या नावावर केले.
परंतु, फायनलच्या पूर्वी, अचानक अशी वेळ आली जेव्हा फॉक्स आणि तिच्या टीमला एखाद्या अशा वस्तूच्या मदतीने इमर्जन्सी फिक्सिंग करावे लागले, ज्याचा कॅनोईंगशी काहीच संबंध नव्हता.

 

 

कंडोमने केले रिपेयर

जेसिका फॉक्सने सांगितले की तिने आपल्या कायक (एक प्रकारची बोट) वर खरचटलेल्या भागाच्या दुरूस्तीसाठी कंडोमचा वापर केला.
तिने टिकटॉक आणि इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये दाखवण्यात आले की, रिपेयरचे काम कसे केले जाते.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये एका माणसाला डॅमेज बोटवर एक प्रकारची काळी पुट्टी लावताना दाखवण्यात आले.
नंतर तो एक कंडोम काढतो आणि पुट्टीला फिक्स करण्यासाठी त्यावर लावतो.
सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडिओ खुप पसंत आला.
लोक हा व्हिडिओ एकमेकांना शेयर करत असून विविध प्रकारच्या कमेंटही करत आहेत.
यूजर्सला डॅमेज बोटीला अशाप्रकारे कंडोमने क्विक फिक्स करण्याची पद्धत खुप पसंत पडत आहे.

 

Web Title : athlete uses a condom to repair her kayakgoes on to win gold in the final in tokyo olympic 2020 video viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PM Kisan | आता ‘या’ शेतकर्‍यांवर कारवाईची तयारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ; परत करावी लागेल रक्कम

HDFC बँकेचे ग्राहक आता विना डेबिट कार्ड ATM वर करू शकतात पैशांचे ट्रांजेक्शन, जाणून घ्या कसे?

Tokyo Olympics | बॉक्सिंगमधून भारतीयांना खुशखबर ! लोव्हलिना बोगोर्हेनने केले पदक निश्चित